AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी या आंदोलनासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नड्डा यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार - जे पी नड्डा
JP Nadda PressImage Credit source: Google
| Updated on: Jul 22, 2026 | 9:13 PM
Share

संपूर्ण देशात सध्या सोमन वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाची चर्चा सुरू आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाद्वारे नीट पेपरफुटीविरोधात आवाज उठवला जात असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच या मुद्द्यावर बोलण्यासाठी केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी या आंदोलनासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. नड्डा यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. जे पी नड्डा यांनी नेमकं काय म्हटले ते सविस्तर जाणून घेऊयात.

आम्ही चर्चेसाठी तयार – नड्डा

संसदेत विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी एका विषय मांडला. यात त्यांनी 150 पेपर लीक बाबत भाष्य केले. राहुल गांधी यांनी केलेल्या 150 पेपरफुटीच्या दाव्याची सखोल चौकशी केली जाईल आणि त्यामागील सत्य देशासमोर मांडले जाईल. पेपरफुटी हा अत्यंत गंभीर विषय असून त्यावर सखोल चर्चा होणे आवश्यक आहे. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. संसदेत चर्चा केली जाईल, सीजेपीसोबतही चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले मुद्दे योग्य आहेत. सरकार या प्रकरणातील प्रत्येक पैलूचा बारकाईने अभ्यास करत असून, परीक्षा व्यवस्थेतील जिथे त्रुटी आढळतील त्या दूर केल्या जातील.’

राहुल गांधी यांच्या आरोपांवर भाष्य

नड्डा यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘पेपरफुटी ही अतिशय गंभीर समस्या आहे आणि यावर सखोल चर्चा होण्याची गरज आहे. कोणत्याही दोषीला सोडले जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित केलेला 150 पेपरफुटीचा दावा आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. यावर सरकारने स्पष्ट भूमिका घेत प्रत्येक दाव्याची सत्यता तपासली जाईल, जबाबदार सरकार म्हणून आम्ही या दाव्याची निश्चितच चौकशी करू आणि सत्य जनतेसमोर मांडू.’ दरम्यान, गेल्या काही काळापासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, मात्र या विषयावर नड्डा यांनी बोलणं टाळलं आहे.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...