Ajit Pawar Plane Crash | अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार
दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालाची माहिती आज संध्याकाळी मिळणार आहे. डीजीसीए (DGCA) वेबसाईटवर हा अहवाल प्रकाशित होईल, असे समजते. विमान अपघात तपासासाठी AAIB ने मागील एक महिना तपास केला होता. प्राथमिक अहवालात अपघाताबाबत सुरूवातीची माहिती दिली जाईल, तर अंतिम अहवालात संपूर्ण तपास आणि निष्कर्ष समाविष्ट असतील.
दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालाची माहिती आज संध्याकाळी मिळणार आहे. डीजीसीए (DGCA) वेबसाईटवर हा अहवाल प्रकाशित होईल, असे समजते. विमान अपघात तपासासाठी AAIB ने मागील एक महिना तपास केला होता. प्राथमिक अहवालात अपघाताबाबत सुरूवातीची माहिती दिली जाईल, तर अंतिम अहवालात संपूर्ण तपास आणि निष्कर्ष समाविष्ट असतील. प्राथमिक अहवालात दोषी कोण आहे किंवा अपघात कसा झाला याबाबत तातडीची माहिती मिळण्याची शक्यता आहे. तसेच, अपघातातील VCR (व्हॉइस रिकॉर्डिंग डिव्हाइस) अमेरिकेच्या कंपनीने बनवलेले असून, त्यासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार आहे. हा VCR भारतात आणून तपास करावा की, अमेरिका कंपनीच्या सहाय्याने परदेशात तपास करावा, हे वरिष्ठ अधिकारी सामूहिकपणे ठरवणार आहेत.
VCR मध्ये दोन पायलट्सचे संभाषण रेकॉर्ड झाले आहे. या रेकॉर्डिंगच्या तपासासाठी कंपनीचे अधिकारी भारतात बोलवायचे की परदेशात पाठवायचे, यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
Published on: Feb 28, 2026 03:27 PM
भाजप शिवसेना संपवाचं काम करतंय, हे आता... बंडखोरीनंतर सत्तारांनी अखेर
कोण कुणाविरुद्ध? विधान परिषद निवडणुकीतील मोठ्या लढतींचं चित्र स्पष्ट
एकनाथ शिंदेंचा आदेश धाब्यावर? रायगडमध्ये शिवसेनेची बंडखोरी?
कॉकरोच जनता पार्टीच्या नव्या घोषणेने खळबळ, आता सर्वात मोठं आंदोलन,

