AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayatollah Khameini: हा तर अमेरिकेचा दहशतवादी हल्ला, खोमेनी यांच्या मृत्यूने भडकले भारतातील शिया धर्मगुरु, काय दिला इशारा?

Shia Clerics: इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खोमेनी यांचा हल्ल्यात कुटुंबासह मृत्यू झाला. खोमेनींच्या मृत्यूनंतर भारतातील शिया धर्मगुरू भडकले आहेत. त्यांनी हा अमेरिकेकडून करण्यात आलेला दहशतवादी हल्ला असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. त्यांनी अमेरिकेला मोठा इशाराही दिला.

Ayatollah Khameini: हा तर अमेरिकेचा दहशतवादी हल्ला, खोमेनी यांच्या मृत्यूने भडकले भारतातील शिया धर्मगुरु, काय दिला इशारा?
शिया धर्मगुरुंचा संतापImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 01, 2026 | 12:32 PM
Share

Ayatollah Khameini Death: इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खोमेनी हे अमेरिका-इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात ठार झाले. खोमेनी यांच्या हल्ल्यामुळे शिया धर्मगुरू भडकले आहेत. त्यांनी हा अमेरिकेकडून करण्यात आलेला दहशतवादी हल्ला असल्याचा संताप व्यक्त केला. शिया धर्मगुरु मौलाना सय्यद कल्बे जवाद म्हणाले की आमच्या धर्मात, पंथात शहिद होणे हा सर्वोच्च मान आहे. प्रत्येक अनुयायी शहीद होण्याची प्रार्थना करतो. अयातुल्ला खोमेनी हे पण तसेच म्हणत असतं. खोमेनी हे त्याचप्रमाणे युद्धाच्या मैदानात लढताना शहीद झाले आहेत. अनेक उलेमा पण त्यांच्या सोबत शहीद झाल्याचे जवाद म्हणाले. अमेरिकेने स्वतःचे मृत्यूपत्र लिहिल्याचा इशाराही त्यांनी दिला.

हा अमेरिकेचा दहशतवाद

हा अमेरिकेचा दहशतवादी हल्ला आहे. खोमेनी यांनी नेहमी गरीब आणि अन्यायग्रस्तांची मदत केली आहे. ज्याप्रमाणे खोमेनींचे रक्त सांडण्यात आले. त्यांचा मृत्यूचा बदला घेण्यात येईल. कारण अशा अन्यायातूनच इन्कलाब बुलंद होतो. अन्याय करणारे त्यात बुडून जातात. ट्रम्प आणि नेतन्याहू यांनी खोमेनी यांना शहीद केले नाही तर त्यांनी स्वतःचे डेथ वॉरंट लिहिले आहे. ट्रम्प आणि नेत्यनाहू यांचा मृत्यू अत्यंत वाईट असेल.

शिया समुदायाकडून तीन दिवसीय दुखवटा

मौलाना सय्यद कल्बे जवाद यांनी सांगितले की खोमेनी यांच्या मृत्यूमुळे शिया समुदाय हा तीन दिवसांचा दुखवटा पाळेल. त्यांनी या तीन दिवसात कोणताही सांस्कृतिक वा इतर कार्यक्रम न आयोजित करण्याचे आवाहन समाजाला केले आहे. या तीन दिवसात दुकानं आणि इतर सेवा बंद ठेवाव्यात. अल्लाहकडे खोमेनींसाठी दुवा मागावी, पण कुणालाही बंद पाळण्यासाठी जबरदस्ती करू नका असे आवाहन जवाद यांनी केले आहे. खोमेनी यांच्या जाण्याने मानवतेचे मोठे नुकसान झाले आहे. कारण ते अन्यायग्रस्तांच्या बाजूने लढले. त्यांनी गरिबांसाठी अमेरिका आणि इस्त्रायलशी दोन हात केले असे जवाद म्हणाले.

लखनऊमध्ये कँडल मार्च

आज रात्री लखनऊ शहरातून शिया समुदाय हा कँडल मार्च काढणार आहे. इमामवाड्यात खोमेनींसाठी शोक सभा आयोजित करण्यात आली आहे. जर कँडल मार्चला परवानगी मिळाली नाही तर शोक सभेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. आपण खोमेनी यांचे मिशन पुढे न्यायाचे असल्याचे जवाद म्हणाले. भारतापाठोपाठ पाकिस्तानसह इतर मुस्लिम देशात खोमेनी यांच्या मृत्यूनंतर वातावरण तापले आहे. श्रीनगरमध्ये मुस्लिम रस्त्यावर उतरले आहेत. तर कराची शहरात अमेरिकेचा दुतावास आगीच्या हवाली करण्यात आला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...