AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या 'तीन' कारणांमुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात?

या ‘तीन’ कारणांमुळे अजित पवारांच्या विमानाचा अपघात?

| Updated on: Mar 01, 2026 | 11:34 AM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल (२८ फेब्रुवारी २०२६) एएआयबीने सादर केला आहे. यामध्ये अपघात होण्याची तीन प्रमुख कारणे नमूद केली आहेत: खराब दृश्यमानता, बारामती विमानतळावरील पायाभूत सुविधांतील त्रुटी आणि पायलटचा ऑपरेशनल निर्णय. अंतिम अहवाल येणे अजून बाकी आहे, ज्यामुळे नेमकी कारणे स्पष्ट होतील.

28 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथे झालेल्या विमान अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरो (AAIB) करत आहे. या अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. अपघातानंतर बरोबर एक महिन्याने, म्हणजेच 28 जानेवारी 2026 रोजी AAIB ने आपला 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे.

या अहवालात अपघाताची तीन प्रमुख कारणे नमूद करण्यात आली आहेत. यामध्ये खराब हवामान (कमी दृश्यमानता), बारामती विमानतळावरील अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि पायलटच्या ऑपरेशनल निर्णयांचा समावेश आहे. अपघाताच्या वेळी बारामती येथील दृश्यमानता केवळ ३ किलोमीटर होती, तर लँडिंगसाठी ५ किलोमीटर दृश्यमानता आवश्यक असते. तसेच, विमानतळावरील रनवे मार्किंग अस्पष्ट होते, खडी आढळली आणि अग्निशामक व्यवस्था अपुरी असल्याचे अहवालात नमूद आहे. अंतिम अहवाल आल्यानंतर अपघाताची नेमकी कारणे स्पष्ट होतील.

Published on: Mar 01, 2026 11:34 AM
Follow Us