AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत मोठी अपडेट, तब्बल इतक्या महिलांना डिसेंबरमध्ये…

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता काही दिवसांपूर्वी बॅंक खात्यात जमा झाला आहे. मात्र, काही महिलांना हा हप्ता अजूनही मिळाला नाही. ज्यामुळे महिलांमध्ये संताप बघायला मिळत आहे. हा आकडा अत्यंत मोठा देखील आहे.

लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत मोठी अपडेट, तब्बल इतक्या महिलांना डिसेंबरमध्ये...
Ladki Bahin Yojana
| Updated on: Jan 28, 2026 | 8:05 AM
Share

राज्य सरकारने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. विशेष म्हणजे या योजनेचा थेट फायदा महायुतीला झाला आणि राज्यातील बहिणींनी मोठे प्रेम सरकारला दिले. भरघोष मते लाडक्या बहिणींनी सरकारला दिली थेट दुसऱ्यांदा महायुतीने राज्यात सरकार स्थापन केले. दर महिन्याला लाडक्या बहिणींना सरकारकडून 1500 रूपये दिली जातात. हे पैसे थेट महिलांच्या बॅंक खात्यात येतात. निवडणुकीच्या वेळी सरकारने लाडक्या बहिणींना 1500 नंतर ते 2100 रूपये हप्ता देणार असल्याने मान्य केले होते. मात्र, अजूनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 करण्यात आला नाही. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींनी हप्ता मिळण्यास उशीर झाला होता. काही दिवसांपूर्वीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या बॅंकेत जमा झाला. मात्र, काही महिलांना हा हप्ता मिळाला नसल्याने संताप बघायला मिळत आहे.

केवायसी अपडेटमुळे अनेक महिलांना या महिन्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाहीये. यादरम्यान सरकारने अंगणवाडी सेविकांकडे संपर्क साधण्याचा आवाहन लाडक्या बहि‍णींना केले आहे. केवायसी करूनही महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाहीये. आता केवायसीमुळे लाभ न मिळालेल्या महिलांची प्रत्यक्षात पडताळणी केली जाणार आहे.

नुकताच आलेल्या आकड्यांवरून केवायसीमुळे तब्बल 30,918 महिलांचा लाभ बंद झाला आहे. 31 जानेवारीपर्यंत केवायसीमुळे लाभ बंद झालेल्या महिलांना अंगणवाडी सेविकांकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 30,918 पैकी 22921 महिला या ग्रामीण भागातील आहेत. आधारकार्डाची झेरॉक्स आणि स्वयंमघोषणीत प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यानंतर महिलांना लाडक्या बहिणीची हप्ता मिळेल.

या महिन्यात काही महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नसल्याने महिला संतप्त झाल्या. ई केवायसी केल्याशिवाय लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नसल्याचे अगोदरच सांगण्यात आले होते. मात्र, काही महिलांचे म्हणणे आहे की, आम्ही केवायसी करूनही आम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही. आता त्यांना आधारकार्डची झेरॉक्स आणि स्वयंमघोषणीत प्रमाणपत्राची तपासणी करून घ्यावी लागणार आहे.

अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय.
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन....
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश.
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?.
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.