AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Special Report | गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा, मुंबईत वाढले सायबर फसवणूकीचे प्रकार

tv9 Marathi Special Report | गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा, मुंबईत वाढले सायबर फसवणूकीचे प्रकार

| Updated on: Mar 14, 2026 | 11:43 AM
Share

गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी सावध करणारी बातमी समोर आली आहे. सध्या गॅस पाईपलाईन कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवून सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. मोबाईलवर संदेश किंवा कॉल करून नागरिकांना फसवले जात असल्याचे उघड झाले आहे.

गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी सावध करणारी बातमी समोर आली आहे. सध्या गॅस पाईपलाईन कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवून सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. मोबाईलवर संदेश किंवा कॉल करून नागरिकांना फसवले जात असल्याचे उघड झाले आहे. मुंबई आणि डोंबिवलीमध्ये गेल्या चार दिवसांत अशा प्रकारे सहा नागरिकांची तब्बल ३० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. मुंबईतील विलेपार्ले आणि वडाळा परिसरात चार वृद्ध नागरिकांना लक्ष्य करत चोरट्यांनी ऑनलाईन फसवणूक केली. दरम्यान, डोंबिवलीत दोन दिवसांत दोन महिलांचीही फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. गॅस कनेक्शन बंद होईल असे सांगून केवळ १० रुपयांचे ई-चलन भरण्यास सांगितले गेले. मात्र, लिंकवर क्लिक करताच एका महिलेच्या खात्यातून सुमारे एक लाख रुपये काढून घेण्यात आले, तर दुसऱ्या महिलेची जवळपास तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी अशा फसव्या कॉल्स आणि लिंकपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Published on: Mar 14, 2026 11:43 AM
Follow Us