AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2026 मध्ये रेकॉर्ड बनवणार, आत्ताच बुक करा नाही तर…, ‘धुरंधर 2’चा ट्रेलर रिलीज, ट्रेलर पाहूनच..

2025 चा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट 'धुरंधर' चा सिक्वेलचा दुसरा भागाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून चाहत्यांनी पुन्हा थिएटरमध्ये धुमाकूळ होणार असं म्हटलं आहे.

2026 मध्ये रेकॉर्ड बनवणार, आत्ताच बुक करा नाही तर..., 'धुरंधर 2'चा ट्रेलर रिलीज, ट्रेलर पाहूनच..
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 07, 2026 | 12:27 PM
Share

Dhurandhar 2 Trailer : जबरदस्त अॅक्शन आणि भावनिक कथानकामुळे प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या धुरंधर या चित्रपटानंतर आता त्याच्या सिक्वेलबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाच्या पुढील भागाचा ट्रेलर आज रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता धुरंधर 2 या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

7 मार्च 2026 रोजी सकाळी 11:01 वाजता या चित्रपटाचा ट्रेलर अधिकृतरीत्या रिलीज करण्यात आला. ट्रेलर पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की हा सिक्वेल पहिल्या भागापेक्षा अधिक डार्क आणि अधिक इंटेन्स असणार आहे. दमदार व्हिज्युअल्स, थरारक अ‍ॅक्शन सीन आणि हाय-स्टेक्स ड्रामामुळे ट्रेलर प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारा ठरत आहे.

ट्रेलरमध्ये रहमान डकैतच्या मृत्यूनंतर कराचीतील ल्यारी भागात निर्माण झालेल्या अस्थिरतेची झलक दाखवण्यात आली आहे. या गोंधळात हमजा ल्यारीचा नवा ‘बादशाह’ बनताना दिसतो. या भूमिकेत रणवीर सिंह पुन्हा एकदा धोकादायक आणि दमदार अवतारात दिसत असून त्याच्या अ‍ॅक्शन सीक्वेन्सची चर्चा सुरू झाली आहे.

प्रमुख कलाकार पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये

ट्रेलरमध्ये रणवीर सिंहच्या तरुण ‘जसकीरत सिंह रंगी’ या भूमिकेची झलकही दाखवण्यात आली आहे. ज्यामुळे या भागात त्याच्या भूतकाळाची कहाणी उलगडणार असल्याचे संकेत मिळतात. याशिवाय मेजर इक्बालच्या भूमिकेत अर्जुन रामपाल आणि अजय सान्यालच्या भूमिकेत आर. माधवन पुन्हा अ‍ॅक्शनमध्ये दिसणार आहेत.

तसेच एसपी चौधरी असलमच्या भूमिकेत संजय दत्त ट्रेलरमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. त्याच्या तोंडी असलेला ‘जहां दर्द है, वहां मर्द है’ हा डायलॉगही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘हौसला, ईंधन, बदला’ हा संवाद या सिक्वेलच्या मुख्य कथानकाचा अंदाज देतो.

ट्रेलरचा रनटाइमही चर्चेत

ट्रेलर रिलीज होण्यापूर्वीच निर्मात्यांनी त्याच्या रनटाइमबाबत टीझर देत चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती. एका ट्वीटमध्ये ‘4 मिनिटांचा शुद्ध अ‍ॅड्रेनालिन रश’ असा उल्लेख करण्यात आला होता. विशेष म्हणजे 2025 मध्ये रिलीज झालेल्या पहिल्या भागाच्या ट्रेलरला यूट्यूबवर 93 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले होते आणि तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप