AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mutton Biryani : एकदा खाल तर पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल! मऊ, रसरशीत मटण बिर्याणी कशी करावी? जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

मऊ, लुसलुशीत आणि मसाल्यांनी भरलेली रसरशीत मटण दम बिर्याणी खाण्याची मजा काही औरच! आता हीच हॉटेलसारखी चव घरच्या घरी अनुभवता येणार आहे. सगळ्यांना आवडेल अशी मटण बिर्याणी, त्यासाठी लागणारं साहित्य आणि रेसिपी हवी असेल तर पटकन खालील माहिती वाचा आणि लगेच मटण बिर्याणी करायला घ्या.

| Updated on: Nov 01, 2026 | 3:44 PM
Share
साहित्य: ७५० ग्रॅम मटण, १ कप / १५० ग्रॅम दही, १ मोठा चमचा बिर्याणी मसाला, १ चमचा गरम मसाला, १ मोठा चमचा लाल तिखट, १/२ चमचा हळद, १ मोठा चमचा धनेपूड, ३-४ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडी पुदिन्याची पाने, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ मोठा चमचा आले-लसूण पेस्ट, १ चमचा मीठ, २ कांदे (उभे कापलेले), चवीनुसार मीठ, २५० ग्रॅम बारीक चिरलेला कांदा, ३ मोठा चमचे तेल, १ मोठा चमचा बिर्याणी मसाला, १ मोठा चमचा धनेपूड, १ चमचा गरम मसाला, १ मोठा चमचा लाल तिखट,  चवीनुसार मीठ, १ कप गरम पाणी, २ कप / ४०० ग्रॅम बासमती तांदूळ, ६ कप पाणी, १ मोठा चमचा मीठ,  २ तमालपत्र, १ काळी वेलची, १ लहान दालचिनी तुकडा, ४-५ लवंगा, ४-५ काळी मिरी, हळदीचे पाणी, २-३ टेबलस्पून तूप

1 / 6
१. मटण मॅरिनेट करण्यासाठी: मटण स्वच्छ धुऊन घ्या. त्यात दही, बिर्याणी मसाला, गरम मसाला, लाल तिखट, हळद, धणेपूड, हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पाने, कोथिंबीर, आलं-लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घाला. सर्व साहित्य मटणाला चांगले लावून घ्या. मटण किमान १ ते २ तास किंवा शक्य असल्यास रात्रभर फ्रिजमध्ये मुरत ठेवा.

2 / 6
२. कांदा तळण्यासाठी: कांद्याच्या पातळ चकत्या करून त्यात थोडे मीठ घाला. कांदा ३० ते ४५ मिनिटे बाजूला ठेवा. त्यातील पाणी हाताने पिळून काढा. कांदा स्वच्छ कापडावर किंवा टिश्यू पेपरवर पसरवून त्यातील ओलावा काढा. पंख्याखाली किंवा उन्हातही वाळवू शकता. कढईत तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत तळा. दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून पातळ चिरलेला कांदा कुरकुरीत आणि गडद सोनेरी होईपर्यंत तळा. तळलेला कांदा बाहेर काढून ठेवा. यालाच बिर्याणीचा बरिस्ता म्हणतात.

3 / 6
३. मटण शिजवण्यासाठी: कुकरमध्ये कांदा तळलेले उरलेले तेल घाला. त्यात सोनेरी केलेला कांदा घालून बिर्याणी मसाला, धणेपूड, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ घाला. आता मॅरिनेट केलेले मटण घालून मसाला मटणाला चांगला लागेपर्यंत परतून घ्या. त्यात गरम पाणी घालून मिक्स करा. कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर साधारण ४ शिट्ट्या होईपर्यंत मटण शिजवा.

4 / 6
४. भात शिजवण्यासाठी: तांदूळ स्वच्छ धुऊन ३ ते ४ वेळा पाणी बदला, तांदूळ ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करा. त्यात मीठ, तमालपत्र, काळी वेलची, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घाला. भिजवलेले तांदूळ पाण्यातील पाणी काढून उकळत्या पाण्यात घाला. मोठ्या आचेवर साधारण ७ ते ८ मिनिटे शिजवा. भात ९० टक्के शिजला की गॅस बंद करून भाताचे पाणी गाळून घ्या.

5 / 6
५. बिर्याणीला दम देण्यासाठी: शिजलेल्या मटणावर भाताचा थर समान पसरवा. त्यावर हळदीचे पाणी, बिर्याणी मसाला, कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने घाला. त्यावर तूप आणि भात शिजवलेल्या पाण्याचे २ ते ३ पळी पाणी घाला. हळदीच्या पाण्याऐवजी केशराचे पाणीही वापरू शकता. तूप घालणे ऐच्छिक आहे. आवडत नसल्यास टाळू शकता. कुकरचे झाकण ठेवून, पण लॉक न करता, मंद आचेवर १५ मिनिटे बिर्याणीला दम द्या. गॅस बंद केल्यानंतर आणखी ५ मिनिटे बिर्याणी तशीच राहू द्या. मऊ, रसरशीत मटण दम बिर्याणी तयार! गरमागरम मटण दम बिर्याणी रायत्यासोबत किंवा सॅलडसोबत सर्व्ह करा.

6 / 6
Follow Us
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
Delhi INDIA Alliance Rally : इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही...
Delhi INDIA Alliance Rally : ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही... राहुल गांधींचा निर्धार; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग

न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी