Maharashtra News LIVE : इंडिया आघाडीकडून दिल्लीच्या रामलीला मैदानावर रॅलीचे आयोजन
इंडिया आघाडीकडून दिल्लीच्या रामलीला मैदानावर रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीला हजारो कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
राम पूर्णेकरांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, सूत्रांची माहिती
प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणात राम पुर्णेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात भेट घेतली. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. पूर्णेकर हत्या प्रकरणात योग्य न्याय मिळणार मारेकरी यांना सरकार पाठीशी घालणार नाही,असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुर्णेकर कुटुंबीयांना दिले.
-
डोंबिवली पूर्वेतील पाणीपुरवठ्याला १६ तासांचा ब्रेक!
डोंबिवली पूर्वेतील पाणीपुरवठ्याला १६ तासांचा ब्रेक लागलाय. खंबाळपाड्यात जलवाहिनी दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे सलग दोन दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. डोंबिवलीला पाणीपुरवठा करणाऱ्या नेतिवलीच्या ११०० मिमी मुख्य जलवाहिनीला खंबाळपाड्यात मोठी गळती होत आहे. गळती दुरुस्तीसाठी मंगळवारी, ३ नोव्हेंबर रोजी तब्बल १६ तास पाणीपुरवठा बंद करण्यात आलाय.
-
-
धाराशिव जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट!
धाराशिव जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट ओढावलं आहे. जिल्ह्यातील २२५ प्रकल्पांत केवळ ५.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. महिनाभरात १.६३ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट झाली आहे. ६४ प्रकल्प कोरडेठाक, १०७ प्रकल्प मृत साठ्याखाली आहेत. सीना कोळेगाव प्रकल्प कोरडा असून मध्यम प्रकल्पांत अवघे ४.९२ टक्के पाणी आहे. १२ गावांना १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.
-
ठाण्यात आज ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा
ठाण्यात आज ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे एकत्र येणार आहेत. लोकतंत्र बचाव’साठी भाजप रस्त्यावर उतरणार आहे. पाचपाखाडी ते तलावपाळी भाजपची पदयात्रा असणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. ठाण्याच्या अहिल्यादेवी होळकर चौक जवळ सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
-
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक : जतमधील मतदान केंद्रावर गोंधळ
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक मतदान सुरू झालं आहे. जतमधील मतदान केंद्रावर गोंधळ झालाय. मतदान झाल्यावर मत दाखवण्यात येत असल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्यांचा आक्षेप आहे. गुप्त मतदानाचा भंग होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. माजी आमदार विक्रम सावंत आणि माजी सभापती सुजय शिंदे यांनी आक्षेप घेतला. विक्रम सावंत यांनी मतदान केंद्रांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
-
-
शरद पवारांचा आजपासून दुष्काळी भागाचा दौरा
शरद पवार आजपासून दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. शरद पवार हे 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर या कालावधित दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रमधील सोलापूर जिल्ह्याचा शरद पवार दुष्काळी दौरा करणार आहेत. आज माढा तालुक्यातील तुळशी गावात दौरा होईल. तर 2 नोव्हेंबरला परांडा, बार्शी, धाराशिव असा दौरा असेल. तर 3 नोव्हेंबरला केज, माजलगाव, गेवराई, बीड भागातील पाहणी करणार आहेत. तर 4 नोव्हेंबर अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भाग करून बारामतीत परत येणार आहेत.
-
सह्याद्री वाचवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा नागपुरातून एल्गार
सह्याद्री वाचवण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत नागपुरातून मोर्चा काढण्यात येणार आहे. कर्जत येथील भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित प्रकल्पासाठी झाडे तोडली जाणार असल्याने या प्रकल्पाला पर्यावरण कार्यकर्त्यांकडून कडाडून विरोध होत आहे. या लढ्यात अग्रेसर असलेले ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे राज्यभरात या प्रकल्पा विरोधात लढा उभारणार आहेत. त्याचा बिगुल सोमवारी नागपुरातून वाजणार आहे, स्वतः सयाजी शिंदे यासाठी उपस्थित राहणार आहेत.
-
-
रत्नागिरीत अंजनारी पुलावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
रत्नागिरी- लांजा – अंजनारी पूल येथे भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात ASI संतोष गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर कंटेनर चालकाचाही मृत्यू झाला. हातखंबा पोलीस वाहतूक शाखेच्या गाडीला कंटेनरची धडक बसली. त्यानंतर गाडी अंजनारी नदीत खोल उतारावर उलटली. या अपघातात तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते.
इंडिया आघाडीची आज दिल्लीत महारॅली आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. रॅलीसाठी कार्यकर्ते जमायला सुरुवात झाले आहेत. या रॅलीसाठी दोन मुख्य स्टेज केले असून कार्यकर्त्यांना बसण्यासाठी हजारो खुर्च्या लावण्यात आल्यात आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी ही रॅली आयोजित केली आहे. या रॅलीसाठी देशभरातून पदाधिकारी पोहोचायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील नांदेड येथून सेवादलाचे कार्यकर्ते पोहोचले असून पावसामुळे खराब झालेलं ग्राऊंड सेवादलाच्या पदाधिकारी यांनी स्वच्छ केलंय. मतचोरी होत असून ती EVM माध्यमातून होत आहे. त्यामुळे निवडणूका या बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी देखील त्यांनी केली. दुसरीकडे ठाण्यातही भाजपकडून ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रेला सुरुवात केली आहे. त्यामुळे ठाण्यात आज पदयात्रेमुळे वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. फडणवीस-शिंदेंच्या पदयात्रेसाठी ठाणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. पाचपाखाडी ते तलावपाळी पदयात्रा ठाण्यात अनेक मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहा जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. मतदानासाठी जिल्ह्यामध्ये 12 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आठ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार आहे.21 पैकी 15 जागा बिनविरोध झाले असून 6 जागांसाठी वेगवेगळ्या गटातून निवडणूक होत आहे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची निवडणूक ही जत सोसायटी गटातील भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची आहे. त्याचबरोबर माजी खासदार संजयकाका पाटील आणि माजी आमदार सुमन आर आर पाटील यांच्यात तासगाव सोसायटी गटासाठी लढत होत आहे. जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस,भाजपा,राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्षाने एकत्रित येत 15 जागा बिनविरोध केले आहेत. मात्र उर्वरित 6 जागांसाठी आज मतदान पार पडत असून गोपीचंद पडळकर आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या लढतीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. यासहित जगासहित देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.
Published On - Nov 01,2026 9:01 AM
