भीमाशंकरच्या वृक्षतोडीच्या चर्चेदरम्यान शिवरायांची जुनी शिकवण पुन्हा चर्चेत

1 नोव्हेंबर 2026

Created By: Sunil Late

भीमाशंकर परिसरातील वृक्षतोडीच्या चर्चेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांची पर्यावरण संवर्धनाबाबतची दूरदृष्टी पुन्हा चर्चेत आली आहे.

जंगल आणि नैसर्गिक साधनसंपत्ती जपण्याला स्वराज्याच्या काळातही महत्त्व दिलं जात असल्याचे ऐतिहासिक संदर्भ सांगतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने प्रचलित ऐतिहासिक पत्रांमध्ये वृक्षतोडीबाबत सावधगिरी बाळगण्याचा संदेश आढळतो.

जंगल आणि जमिनीचं नुकसान झाल्यास त्याचा परिणाम शेती आणि सामान्य जनजीवनावर होऊ शकतो, हा महत्त्वाचा विचार या संदर्भातून समोर येतो.

गडकोटांवरील झाडी संरक्षणासाठी आणि लष्करी रणनीतीसाठी महत्त्वाची असल्याने तिची जपणूक करण्यावर भर दिला जात होता.

पर्यावरणाचं रक्षण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची जपणूक करण्याची शिवरायांची शिकवण आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आहे.