AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi: ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात नवीन बॉम्बगोळा, राहुल गांधी यांची मोठी हिंट, आज काय खुलासा?

Rahul Gandhi on CEC Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आज इंडिया आघाडीची दिल्लीत महारॅली होत आहे. त्यापूर्वीच राहुल गांधी हे त्यांच्याविरोधात नवीन बॉम्बगोळा टाकण्याच्या तयारीत आहेत. काल झालेल्या मॉक पार्लमेंटमध्ये त्यांनी याची हिंट दिली आहे.

Rahul Gandhi: ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात नवीन बॉम्बगोळा, राहुल गांधी यांची मोठी हिंट, आज काय खुलासा?
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात नवीन बॉम्बगोळा, राहुल गांधी यांची मोठी हिंट, आज काय खुलासा?
| Updated on: Nov 01, 2026 | 9:58 AM
Share

Rahul Gandhi on CEC Gyanesh Kumar: केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने मोर्चा उघडला आहे. थोड्या ब्रेकनंतर आज ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीतील रामलीला मैदानावर महारॅली होत आहे. SIR प्रक्रिया आणि कोट्यवधी नागरिकांची नावं मतदार याद्यांबाहेर फेकल्या गेल्याने महाआंदोलन होत आहे. त्याचवेळी राहुल गांधी हे मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मोठा नवीन खुलासा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. काल प्रति संसदेत त्यांनी याविषयीची हिंट दिली. ज्ञानेश कुमारांविरोधात अत्यंत गंभीर आरोप आणि मोठा खुलासा करण्याच्या ते तयारीत आहेत.

मॉक पार्लमेंटमध्ये राहुल गांधींचा एल्गार

काल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी प्रति संसद भरवण्यात आली. त्यात ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची शिफारस करण्यात आली. विरोधक ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सर्व आयुधं वापरत असल्याचे दिसत आहे. लोकशाही मार्गाने संताप व्यक्त करत आहेत. काल राहुल गांधी यांनी जोरदार आणि आक्रमक भाषण केले. त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. भाजप ज्ञानेश कुमार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी आजच्या महारॅलीत नवीन राजकीय बॉम्ब टाकण्याचे संकेत दिले. काल मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोगाचा एक सांकेतिक प्रस्तावही मंजूर करण्यात आला.

भाजपकडूनही राहुल गांधींवर हल्लाबोल

राहुल गांधी यांच्या कालच्या भाषणाने राजकीय वातावरण तापले. भारतीय जनता पक्षानेही काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावर तिखट प्रतिक्रिया दिली. मॉक पार्लमेंट हे एक नाटक असल्याची टीका भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली. आगामी निवडणुकीतील पराभव लक्षात आल्यापासूनच राहुल गांधी आणि काँग्रेस घटनात्मक संस्थांवर निराधार आरोप करत असल्याची टीका संबित पात्रा यांनी केली. मतदार याद्यांमधील सखोल पुनरीक्षण SIR विषयी काँग्रेस समाजात दिशाभूल करत असल्याचा आरोपही पात्रा यांनी केला.

सकाळी 10 वाजता सुरूवात

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघणारी ही महारॅली सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत रामलीला मैदानावर होत आहे. सकाळी इंदिरा भवन येथून मिंटो रोडपर्यंत खुल्या बसमधून इंडिया आघाडीतील प्रमुख नेते येतील. तिथून पायी ते रामलीला मैदानाकडे निघतील. या रॅलीत ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील 20 घटक पक्षांचे प्रमुख नेते सहभागी होतील. तर सीजेपी आणि इतर पक्षांनी सुद्धा या महारॅलीला पाठिंबा दिला आहे.

Follow Us
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!