AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत पिवळं वादळ धडकणार! आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक, दीपक बोराडे यांचा नवा प्लान ठरला

मुंबईत पिवळं वादळ धडकण्याची शक्यता आहे. एसटी समाजातून आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक झाला आहे . आता धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांचा नवा प्लान ठरला आहे.

मुंबईत पिवळं वादळ धडकणार! आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक, दीपक बोराडे यांचा नवा प्लान ठरला
dhangar reservation Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 01, 2026 | 3:27 PM
Share

सागर सुरवसे, प्रतिनिधी : आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. आता 1 डिसेंबर रोजी अहिल्यानगर येथे ईशारा मेळावा घेऊन मुंबईला जाण्याची तारीख ठरणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक दिपक बोराडेंनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात घेण्याच्या मागणीसाठी दिपक बोराडे पुन्हा एकदा राज्यव्यापी दौऱ्यावर आहे.  धनगर समाजाचे नेते दिपक बोराडे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करत आरक्षणाची मागणी केली.

दीपक बोराडे म्हणाले,गेल्या आठ दशकापासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून वंचित ठेवण्याचे काम केलं. 2014 मध्ये निवडणुकी वेळी भाजपने धनगर समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाखोच्या सभेत सांगितलं होतं, आम्हाला सत्ता द्या, धनगर समाज आरक्षणाचा अभ्यास झाला आहे, असं सांगितलं होतं. धनगर समाजामुळे राज्यात भाजपचे सरकार आलं, असं देवेंद्र फडणवीस साहेब किती वेळा तरी बोलले आहेत. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस हे धनगराच्या उपकाराची जाणीव विसरले आहेत, त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. 17 सप्टेंबर 2025 ला आम्ही मराठवाड्यातून लढा सुरू केला आहे. आता सध्या पश्चिम महाराष्ट्रात आमचा लढा पोहोचला आहे’.

‘बारा वर्षापासून भाजप सरकार धनगर समाजाची फसवणूक करत आहे. धनगरांच्या भावनांशी खेळण्याचा पाप करत आहे. मोठ्या संघर्षासाठी धनगर बांधवांना तयार करण्याचं काम सुरू आहे.  एक डिसेंबर रोजी अहिल्यानगरमध्ये धनगर समाजाचा महाएल्गार मेळावा होणार आहे. हा सरकारसाठी इशारा मेळावा असणार  आहे. एक डिसेंबर रोजी होणाऱ्या एल्गार मेळाव्यातून मुंबईला जाण्याची तारीख जाहीर होणार आहे,असे दीपक बोराडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मराठा समाजाने देखील आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. परंतु मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला 90 दिवसांचा कालावधी सरकारला दिला आहे. मराठा समाजानंतर आता धनगर समाजानेही आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Follow Us
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
Delhi INDIA Alliance Rally : इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही...
Delhi INDIA Alliance Rally : ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही... राहुल गांधींचा निर्धार; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी