AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संकटातही हार मानत नाहीत या तारखेला जन्मलेले लोक, सल्ला घेण्यासाठी या व्यक्तींकडे लागतात रांगा

प्रचंड संकटात देखील या तारखेला जन्मलेले लोक शांत आणि खूप विचार करून मार्ग काढतात. त्यासोबत या तारखेला जन्मलेले लोक इतरांच्या नेहमी मदतीला धावून जातात.

संकटातही हार मानत नाहीत या तारखेला जन्मलेले लोक, सल्ला घेण्यासाठी या व्यक्तींकडे लागतात रांगा
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 01, 2026 | 3:22 PM
Share

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. या मूलांकाचा स्वामी देवगुरू बृहस्पती मानला जातो. बृहस्पती हे ज्ञान, बुद्धिमत्ता, विवेक आणि मार्गदर्शनाचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे मूलांक 3 असलेल्या व्यक्ती समजूतदार, हुशार आणि योग्य सल्ला देणाऱ्या असतात असे अंकशास्त्रात सांगितले जाते.

मूलांक 3 असलेल्या व्यक्ती कोणताही निर्णय घाईघाईने घेत नाहीत. एखाद्या विषयाच्या सर्व बाजू समजून घेतल्यानंतरच त्या आपले मत मांडतात. त्यांची विचार करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असते. त्यामुळे कुटुंबातील सदस्य आणि मित्र अनेकदा आपल्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा सल्ला घेतात.

कठीण परिस्थितीतही शोधतात मार्ग

या मूलांकाच्या व्यक्ती संकटाच्या काळात घाबरून जाण्याऐवजी समस्येवर उपाय शोधण्याला प्राधान्य देतात. त्या संयमाने परिस्थिती समजून घेतात आणि व्यावहारिक मार्ग सुचवतात. केवळ धीर देण्याऐवजी समस्येचे योग्य विश्लेषण करून मार्गदर्शन करण्याची त्यांची हातोटी असते.

नेतृत्व करण्याची असते क्षमता

मूलांक 3 असलेल्या व्यक्तींमध्ये नेतृत्वगुण चांगले असल्याचे मानले जाते. कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास त्या मागेपुढे पाहत नाहीत. समूहामध्ये काम करताना नियोजन करणे, योग्य दिशा ठरवणे आणि इतरांना सोबत घेऊन पुढे जाणे त्यांना आवडते. त्यामुळे शिक्षण, व्यवस्थापन आणि मार्गदर्शनाशी संबंधित क्षेत्रांमध्ये त्या चांगली कामगिरी करू शकतात.

धार्मिक विचार आणि नैतिक मूल्यांना महत्त्व

अंकशास्त्रानुसार या व्यक्ती धार्मिक वृत्तीच्या आणि नैतिक मूल्यांना महत्त्व देणाऱ्या असतात. योग्य-अयोग्य यातील फरक ओळखणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते. आपल्या तत्त्वांशी तडजोड करणे त्यांना फारसे आवडत नाही. देवावरील श्रद्धा आणि चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवणे हा त्यांच्या स्वभावाचा भाग मानला जातो.

मदतीसाठी नेहमी असतात पुढे

मूलांक 3 च्या व्यक्तींचा स्वभाव उदार असल्याचे मानले जाते. एखादी व्यक्ती अडचणीत असल्याचे दिसल्यास त्या मदतीसाठी पुढे येतात. इतरांचे म्हणणे ऐकून घेणे आणि त्यांच्या समस्यांवर उपाय सुचवणे त्यांना आवडते. त्यामुळे मित्रपरिवारात आणि नातेवाईकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वासाची भावना निर्माण होते.

महत्त्वाची टीप : वरील सर्व माहिती अंकशास्त्रातील मान्यतांवर आधारित आहे. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, यश आणि भविष्य केवळ मूलांकावर अवलंबून नसते. त्यासाठी मेहनत, शिक्षण, अनुभव आणि परिस्थिती यांचाही महत्त्वाचा वाटा असतो.

Follow Us
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
Delhi INDIA Alliance Rally : इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही...
Delhi INDIA Alliance Rally : ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही... राहुल गांधींचा निर्धार; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी