AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omar Abdullah: वयाच्या 56 व्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी पत्रकाराशी थाटला संसार; दोघांच्या वयात किती अंतर?

निधी राजदान या देशातील प्रसिद्ध पत्रकार आणि न्यूज अँकर आहेत. त्यांनी एनडीटीव्हीमध्ये दोन दशकांहून अधिक काळ काम केले आहे. निधी यांचंही यापूर्वी लग्न झालं होतं. त्यामुळे ओमर अब्दुल्ला आणि निधी राजदान या दोघांसाठीही हा आयुष्यातील दुसरा संसार आहे.

| Updated on: Nov 01, 2026 | 12:40 PM
Share
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला सध्या त्यांच्या राजकीय कामापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी प्रसिद्ध पत्रकार आणि न्यूज अँकर निधी राजदान यांच्याशी दुसरं लग्न केलं आहे. तब्बल 30 वर्षांचा पहिला संसार संपल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.

1 / 5
या लग्नाची माहिती दोघांनीही सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली. विशेष म्हणजे, या दोघांच्या वयातील अंतर किती आहे, याबद्दलही सध्या चर्चा सुरू आहे. ओमर अब्दुल्ला यांचा जन्म 10 मार्च 1970 रोजी झाला. सध्या ते 56 वर्षांचे आहेत. तर प्रसिद्ध पत्रकार निधी राजदान यांचा जन्म 11 एप्रिल 1977 रोजी झाला असून त्यांचं वय 49 वर्षे आहे. म्हणजेच ओमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांच्या वयात सात वर्षांचं अंतर आहे. दोघांचंही हे दुसरं लग्न आहे.

2 / 5
ओमर अब्दुल्ला यांनी 31 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर निधी राजदान यांच्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले. 'कालपासून एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली', अशा आशयाचं कॅप्शन देत त्यांनी आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. दुसरीकडे निधी राजदान यांनीही हेच फोटो शेअर करत 'इट्स डन ब्रो' असं मजेशीर कॅप्शन दिलं.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, 30 ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये विशेष विवाह कायद्यांतर्गत त्यांचा विवाह पार पडला. या खासगी सोहळ्याला दोन्ही कुटुंबांतील मोजके सदस्य आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते. श्रीनगर आणि दिल्लीमध्येही लग्नासंबंधित कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

4 / 5
ओमर अब्दुल्ला यांचं पहिलं लग्न 1994 मध्ये पायल नाथ यांच्याशी झालं होतं. या लग्नातून त्यांना झहीर आणि झमीर अशी दोन मुलं आहेत. मात्र, 2009 पासून दोघेही वेगळे राहत होते. त्यांच्यातील वैवाहिक वाद न्यायालयापर्यंत पोहोचला होता. अखेर 31 जुलै 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दोघांच्या परस्पर संमतीने घटस्फोटाला मंजुरी दिली. त्यानंतर काही महिन्यांतच ओमर यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

5 / 5
Follow Us
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग

न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!