AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lalit Prabhakar: कसाबची भूमिका साकारल्यानंतर ललित प्रभाकरचा ताज हॉटेलमधील रुबाबदार अंदाज, फोटो चर्चेत

Lalit Prabhakar: ललितच्या या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याच्या स्टायलिश लूकपासून ते फोटोंच्या सौंदर्यापर्यंत अनेक गोष्टींची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. ताज हॉटेलच्या भव्यतेसोबत ललितचा साधा, पण आकर्षक अंदाज चाहत्यांना भावला आहे.

| Updated on: Nov 01, 2026 | 9:34 AM
Share
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर सध्या त्याच्या एका खास फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. ‘ताज इज अॅन इमोशन’ (ताज ही एक भावना आहे) असं कॅप्शन देत अभिनेत्याने मुंबईतील प्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेलमधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

1 / 5
विशेष म्हणजे, ‘प्रहार’ चित्रपटात दहशतवादी अजमल कसाबची भूमिका साकारल्यानंतर ललितचा ताजमधील हा रुबाबदार अंदाज पाहून चाहत्यांमध्ये त्याची चर्चा रंगली आहे. ललित प्रभाकरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो ताज हॉटेलच्या भव्य वास्तूच्या पार्श्वभूमीवर दिसत आहे.

2 / 5
पांढऱ्या रंगाच्या स्टायलिश पोशाखात त्याने दिलेल्या पोझ चाहत्यांना विशेष आवडल्या आहेत. या फोटोशूटसाठी ललितने खास स्टायलिंग केलं असून, त्याच्या लूकमध्ये एक वेगळाच रुबाब पाहायला मिळत आहे. ‘ताज इज अॅन इमोशन’ असं कॅप्शन देत त्याने या ऐतिहासिक वास्तूबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

3 / 5
त्याच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. ललित प्रभाकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून लोकप्रिय झालेल्या ललितने ‘अनन्या’, ‘झोंबिवली’, ‘मीडियम स्पायसी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत.

4 / 5
नुकत्याच आलेल्या ‘प्रहार’ चित्रपटात त्याने अजमल कसाबची भूमिका साकारली होती. मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटातील त्याच्या भूमिकेची चर्चा झाली होती. या गंभीर भूमिकेनंतर ताज हॉटेलमध्ये केलेलं त्याचं फोटोशूट विशेष लक्ष वेधून घेत आहे.

5 / 5
Follow Us
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!