Prajakta Mali: तू पाठमोरी गौरव मोरेसारखी वाटली… प्राजक्ता माळी नव्या व्हिडीओमुळे झाली ट्रोल
Prajakta Mali: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही कायमच चर्चेत असते. नुकताच तिने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे तिला ट्रोल केले जात आहे. आता हा व्हिडीओ नेमका काय आहे? चला जाणून घेऊया...

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिने सोशल मीडियाद्वारे नव्या प्रोजेक्ट्सविषयी माहिती दिली आहे. या चित्रपटांच्या शूटिंगसाठी प्राजक्ता राजस्थानमधील वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसत आहे. ती सोशल मीडियावर देखील तेथे फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे तिला ट्रोल केले जात आहे.
प्राजक्ता माळीने तिचा लूक चेंज केला आहे. तिने केस शॉर्ट केले आहेत. तसेच तिने वजन देखील कमी केल्याचे दिसत आहे. या नव्या लूकमध्ये फिरताना प्राजक्ता सोशल मीडियावर सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे. नुकताच प्राजक्ताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर जैसलमेर दुर्ग फिरतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्राजक्ताने पिवळसर रंगाचा ओवर साइज टीशर्ट परिधान केला आहे. त्यावर निळ्या रंगाची जीन्स घातली आहे आणि हातात स्कार्फ घेतला आहे.
View this post on Instagram
काय आहे व्हिडीओ?
व्हिडीओमध्ये प्राजक्ता हातात स्कार्फ घेऊन फिरताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने अजूनही त्या आठवणींतून बाहेर पडू शकत नाहीये… मुझको भावे तेरी गलियां… #जैसलमेरदुर्ग आणि यासोबतच, मला तेव्हाही जाणवत होते आणि आजही जाणवत आहे, ती एक प्रकारची मुक्तता आणि शांतता! या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
सध्या सोशल मीडियावर प्राजक्ता माळीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने, आमच्या महाराष्ट्राची स्टार राजस्थानमध्ये जमकत आहे अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, राजस्थान सहलीचा मनमुराद आनंद लुटतांना प्राजक्ता माळी. एकदम भारी दिसत आहे. आपल्या आनंद दाई सहलीला खूप खूप शुभेच्छा अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने तिची तुलना थेट अभिनेता गौरव मोरेशी केली आहे. ‘सॉरी पण पाठमोरी मला खरंच गौरव मोरे वाटली’ अशी कमेंट केली आहे. सध्या सोशल मीडियावर प्राजक्ताचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.
