AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Kisan Yojana: खात्यात नाही आले पैसे? पीएम किसानचे 2 हजार कुठे अडकले? झटपट करा हे काम

PM Kisan Yojana 24th Installment: पीएम किसान सन्मान निधीचा 24 वा हप्ता तुमच्याही खात्यात जमा झाला नाही का? जर दोन हजारांची रक्कम जमा झाली नसेल तर अगोदर घरबसल्या स्टेट्‍स चेक करा आणि नंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

PM Kisan Yojana: खात्यात नाही आले पैसे? पीएम किसानचे 2 हजार कुठे अडकले? झटपट करा हे काम
खात्यात नाही आले पैसे? पीएम किसानचे 2 हजार कुठे अडकले? झटपट करा हे काम
| Updated on: Nov 01, 2026 | 1:23 PM
Share

PM Kisan Yojana 24th Installment: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 24 वा हप्ता दोन दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात केंद्र सरकार 6,000 रुपये जमा करते. तीन हप्त्यात ही रक्कम जमा करण्यात येते. 30 ऑक्टोबर 2026 रोजी योजनेतंर्गत 24 वा हप्ता जमा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहे. जर तुमच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली नसेल तर अगोदर पेमेंट स्टेट्‍स चेक करा आणि नंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

अगोदर स्टेट्‍स चेक करा

शेतकऱ्यांनी अगोदर pmkisan.gov.in या पोर्टलवर जाऊन फार्मर कॉर्नरवर लॉगिन करावे. ‘Know Your Status’ हा पर्याय निवडून स्टेट्‍स चेक करा. त्यात ‘Land Seeding’ वा ‘e-KYC’ समोर ‘No’ असे लिहिलेले असेल तर समजा तांत्रिक बाबींची पूर्तता न केल्याने तुमचा हप्ता थांबलेला आहे. लगेचच जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ती माहिती अपडेट करा.

पोर्टलवरील फार्मर कॉर्नरवर एडिट अथवा अपडेट आधार, बँकेचा तपशील हा पर्याय निवडावा. तिथे तुमचे योग्य नाव, बँकेचा योग्य खाते क्रमांक, IFSC क्रमांक टाकावा. त्यानंतर ही माहिती योग्य आहे की नाही याचा पडताळा करा आणि त्यानंतर ही माहिती सबमिट करावी.

या कारणामुळे अडकू शकतो पीएम किसानचा हप्ता

जर ईकेवायसी प्रक्रिया अपूर्ण असेल तर शेतकर्‍यांचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासोबतच शेतजमिनीचा पडताळा, आधार लिकिंग आणि दस्तावेजातील नावातील चूक हे लागलीच दुरूस्त करणे आवश्यक आहे.

eKYC अपूर्ण – ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर हप्ता अडकण्याची शक्यता आहे. अगोदर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा.

नावात चूक – आधार कार्ड आणि बँक खात्यातील नावात स्पेलिंग चुकीचे असेल तर तर हप्ता जमा होणार नाही.

शेतजमिनीचा पडताळा- बँक खाते आणि पीएम किसान पोर्टलवर जमिनीच्या दस्तावेजांचा अगोदर पडताळा करा.

आधार लिंकिंगची अडचण- बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. DBT (Direct Benefit Transfer) हा पर्याय नेहमी इनेबल ठेवा.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या यादीत नाव आहे की नाही?

यादीत नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी अगोदर pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. साईटवर शेतकरी कॉर्नर हा पर्याया निवडा. लाभार्थ्यांची यादी तपासा. याठिकाणी शेतकऱ्यांनी आधार क्रमांक, खाते क्रमांक टाकावा. आता “Get Data” वर क्लिक करुन लागलीच पेमेंट स्टेट्सवर क्लिक करून चेक केल्यास संपूर्ण माहिती समोर येईल.

ई-केवायसी पूर्ण केली असेल तर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसा जमा होईल. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तर एग्रीस्टॅक या पोर्टलवर जाऊन नोंदणी करणे ही सरकारने अत्यावश्यक केले आहे. तरच खात्यात पैसा येईल.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकर्‍यांना 1800-115-5525 या हेल्पलाईन क्रमांक वर संपर्क कराता येईल. या ठिकाणी त्यांच्या प्रश्नांचे निरसन होण्यास मदत होईल.

हप्ता जमा न झाल्यास शेतकरी हेल्पलाईन क्रमांक – 155261 वा टोल फ्री क्रमांक- 1800115526 वर कॉल करू शकतात. 011-23381092 या क्रमांकावर मदत मागू शकतात. शेतकरी pmkisan-ict@gov.in च्या माध्यमातून तक्रार नोंदवू शकतात.

Follow Us
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?