AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women Farmer Certificate: महिला शेतकरी नोंदणीत विक्रमी झेप, तुम्ही नोंद केली की नाही? प्रक्रिया काय, अर्ज कसा करणार?

Women Farmer Certificate: राज्यातील महिला शेतकर्‍यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. आता महिलांच्या नोंदणीतही राज्याने मोठी झेप घेतली आहे. कसा कराल या प्रमाणपत्रासाठी अर्ज? काय होईल फायदा? जाणून घ्या...

Women Farmer Certificate: महिला शेतकरी नोंदणीत विक्रमी झेप, तुम्ही नोंद केली की नाही? प्रक्रिया काय, अर्ज कसा करणार?
महिला शेतकरी नोंदणीत विक्रमी झेप, तुम्ही नोंद केली की नाही?
| Updated on: Nov 01, 2026 | 12:44 PM
Share

Women Farmer Certificate: राज्यातील महिला शेतकर्‍यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ विधेयक मंजूर झाले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर महिला शेतकऱ्यांना शेती आणि शेतीपूरक व्यवसायांमधील योगदान अधोरेखित करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याला राज्यातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. राज्यात जवळपास 38 लाख शेतकरी महिलांनी या प्रमाणपत्रासाठी नोंद केली आहे. सर्वाधिक नोंदणी ही अहिल्यानगर जिल्ह्यात झाली आहे. या जिल्ह्यातील 3 लाख 20 हजार महिला शेतकऱ्यांची नोंद पूर्ण झाली आहे. तर राज्यात महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रही वितरीत करण्यात येत आहे. कसा कराल या प्रमाणपत्रासाठी अर्ज? काय होईल फायदा? जाणून घ्या…

या महिलांना शेतकरी म्हणून दर्जा

शेतात काम करणाऱ्या महिला, बीज उत्पादन क्षेत्रातील महिला, पशूसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिका पालन, मासेमारी, फलोत्पादन, पुष्पोत्पादन, अळंबी लागवड, कृषी वनीकरण, चराई व्यवसायातील महिला, कंपोस्ट खत व्यवसायातील महिला, बटाईदार महिला आणि शेतीशी संबंधित जोड व्यवसाय करणाऱ्या महिलांना महिला शेतकरी म्हणून दर्जा देण्यात आला आहे.

प्रमाणपत्रासाठी प्रक्रिया काय? कसा करणार अर्ज?

महिला शेतकरी प्रमाणपत्राविषयीची इंत्यभूत माहिती शेतकरी महिलांना mahakrushi.maharashtra.gov.in या साईटवर मिळेल. या पोर्टला भेट देऊन महिला शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. नजीकच्या सीएससी केंद्रावर जाऊनही त्यांना अर्ज करता येणार आहे.

मोबाईल क्रमांक टाकून आणि ओटीपी द्वारे पडताळणी करून नोंदणी करता येईल आणि नंतर लॉगिन करता येईल. ही प्रक्रिया झाल्यानंतर महिला शेतकऱ्यांना त्यांचा जिल्हा, तालुका आणि गावाची निवड करावी लागणार आहे.

या अर्जासोबत महिलांना आधारा कार्ड, त्याच्याशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो, 7/12 आणि 8-अ उतारा असल्यास तो जोडावा, ग्रामसेवक दाखला अथवा रहिवासी दाखला द्यावा लागेल.

तुमचा अर्ज संबंधित ग्रामसभा अथवा नगरपंचायतीच्या सभेपुढे ठेवला जाईल. ग्रामसभेच्या ठरावानंतर साधारणपणे 15 ते 30 दिवसांच्या आता महिला शेतकरी प्रमाणपत्र ऑनलाईन देण्यात येईल. पोचपावती क्रमांकावरून प्रमाणपत्र या साईटवरून डाऊनलोड करता येईल.

काय होणार फायदा?

या नोंदणीद्वारे राज्यातील महिला शेतकऱ्यांचा स्वतंत्र डिजिटल डेटाबेस तयार होईल. महिला शेतकर्‍यांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र ‘महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी’ स्थापन करण्यात येणार आहे. जिल्हा आणि तालुका तर गावस्तरापर्यंत मजबूत यंत्रणा उभारण्यात येईल. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय देखरेख समिती या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवेल. राज्यातील लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध होईल.

Follow Us
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!