AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी अचानक भाषण थांबवलं, 2-3 नेते धावून आले; दिल्लीतील स्टेजवर नेमकं काय घडलं?

दिल्लीतील आंदोलनात मल्लिकार्जुन खर्गे यांनी अचानक भाषण थांबवलं. त्यानंतर 2-3 नेते मदतीला धावून आले; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

मल्लिकार्जुन खर्गे यांनी अचानक भाषण थांबवलं, 2-3 नेते धावून आले; दिल्लीतील स्टेजवर नेमकं काय घडलं?
Mallikarjun khargeImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 01, 2026 | 3:59 PM
Share

नवी दिल्लीच्या रामलीला मैदानात राहुल गांधी यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. इंडिया आघाडीच्या महारॅलीतून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या मंचावरून उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अचानक भाषण थांबवलं. त्यानंतर दोन-तीन नेते धावत पळत आले. भाषण देताना माईकमध्ये बिघाड झाल्याने मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाषण थांबवलं. पुढील काही वेळात माईक सुरू झाल्यानंतर पुन्हा भाषण सुरू केलं.

नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिसकवण्याचा प्रयत्न सुरू – खर्गे 

इंडिया आघाडीच्या महारॅलीला सर्व पक्षीय नेत्यांनी हजेरी लावली आहे. या महारॅलीत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी पंतप्रधान मोदींना पदावरून हटवण्याचा नारा दिला. या रॅलीतील सभेत मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ‘मोदीजी, फक्त तुमचे पोलीस काम करतात, असं समजू नका. तुम्ही सीबीआय मागे लावून घाबरवता. ईडीला मागे लावता. अनेक केंद्रीय यंत्रणा मागे लावता. आम्ही घाबरणारे नाहीत.  आम्ही लढणारे नेते आहेत. आज लोकांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांचा मतदानाचा अधिकार हिसकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना कोणी मतदान केलं पाहिजे, याची निवड करू लागले आहेत. जनता त्यांची निवड करत नाही. तर आता मतदार ठरवू लागले आहेत.

मल्लिकार्जुन खर्गेंनी दिला मोदी हटावचा नारा 

‘आज केंद्र सरकार असो महाराष्ट्र सरकार बिहार सरकार उत्तर प्रदेश हे चोरीचे सरकार आहेत. यांना हटवावे लागेल. चोरांची हकालपट्टी करावी लागेल. त्यासाठी तुमचा पाठिंबा हवा आहे. मोदी जाणार असले, तर लोकशाही राहील. मोदींना हटवा आणि लोकशाही वाचवा. तुम्ही सर्वांनी शांत ऐकून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भाषणे ऐकावीत. मोदींना हटवण्यासाठी मजबुतीने लढुयात. आपण एकत्र येऊन लढुयात. मोदींना हटवुयात.  लोकशाहीला मजबूत करुयात. देशाला बळकट करूयात, असं आवाहन मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलं.

Follow Us
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
Delhi INDIA Alliance Rally : इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही...
Delhi INDIA Alliance Rally : ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही... राहुल गांधींचा निर्धार; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी