tv9 Marathi Special Report | मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की… नेत्यांच्या विधानाची बिटविन द लाईन काय?
मुंबईत भाजपचाच महापौर होणार हे जवळपास निश्चित झालंय. दबावाला बळी पडायचं नाही, अशी सूचना केंद्रीय नेतृत्वाकडून भाजपच्या नेत्यांना देण्यात आल्याचं कळतंय. तर 30 तारखेला भाजपचा महापौर विराजमान होणार, अशी माहिती आहे.
महापालिका निवडणूक होऊन त्याचा निकालही लागला, मात्र मुंबईचा महापौर कोण होईल याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुंबईत भाजपचाच महापौर होणार हे जवळपास निश्चित झालंय. दबावाला बळी पडायचं नाही, अशी सूचना केंद्रीय नेतृत्वाकडून भाजपच्या नेत्यांना देण्यात आल्याचं कळतंय. तर 30 तारखेला भाजपचा महापौर विराजमान होणार, अशी माहिती आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून अडीच वर्ष महापौर पदाची मागणी असल्याचं कळतंय. 23 जानेवारीपासून शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होते, त्यामुळे शिंदेंचा महापौर व्हावा, असं शिंदेंचे नेते सांगत आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम महायुतीचाच महापौर होईल, असं सांगत असले तरी त्यातील Between the line फार महत्वाची आहे. तडजोड करण्याचा विषयच नाही, असं भाजप नेते अमित साटम थेट दिल्लीतून म्हणाले, यातून अर्थ स्पष्ट होतोय की मुंबईत 89 नगरसेवक जिंकून आलेल्या भाजपचाच महापौर होईल.

