BMC Corporaters | 25 फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांची घोषणा, इच्छुकांची पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग
मुंबई महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून 25 फेब्रुवारी रोजी स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची घोषणा होणार आहे. यासाठी विविध पक्षांमध्ये इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीला सहा स्वीकृत नगरसेवकांची संधी मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून 25 फेब्रुवारी रोजी स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची घोषणा होणार आहे. यासाठी विविध पक्षांमध्ये इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीला सहा स्वीकृत नगरसेवकांची संधी मिळण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तीन जागा मिळू शकतात. काँग्रेसला एक स्वीकृत नगरसेवक पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या नियुक्त्यांमुळे पालिकेतील राजकीय समीकरणांवर काही प्रमाणात परिणाम होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्वीकृत नगरसेवकांना महापालिका सभागृहात मतदानाचा अधिकार नसतो. मात्र त्यांना सभागृहातील चर्चांमध्ये सहभागी होण्याचा आणि विविध विषयांवर मते मांडण्याचा अधिकार असतो. त्यामुळे या पदांना राजकीय दृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्ती प्रक्रियेसाठी राज्य सरकारची अधिकृत मान्यता आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या संदर्भातील अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता असून, इच्छुकांचे लक्ष आता पक्षश्रेष्ठी आणि राज्य सरकारच्या भूमिकेकडे लागले आहे.
Published on: Feb 18, 2026 12:15 PM
KDMC तील डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या शिंदेंच्या कार्यकत्यांवर थेट कारवा
सचिन अहिर पहिला बॉम्ब... आता अजून स्फोट होणार!
शरद पवार सत्तेत जाण्याच्या चर्चेदरम्यानच आणखी वेगळंच घडलं! पक्षातील
राजकीय हालाचालींना वेग! संजय राऊतांचं नितेश राणेंना पत्र, थेट म्हणाले

