Sanjay Raut | दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक, इथल्याच कंपन्या…; संजय राऊतांची खोचक टीका
देशभरातल्या मुख्यमंत्र्याची पिकनिक दावोसला सुरु आहे. ते संपल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महापौरच्या निवडणुकीत लक्ष घालतील, अशी खोचक टीका शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. स्वित्झर्लंडमधल्या दावोसमधील औद्योगिक कॉन्फरन्स सुरू आहे. ती अत्यंत हास्यास्पद असल्याचं राऊत म्हणाले.
देशभरातल्या मुख्यमंत्र्याची पिकनिक दावोसला सुरु आहे. ते संपल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महापौरच्या निवडणुकीत लक्ष घालतील, अशी खोचक टीका शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. स्वित्झर्लंडमधल्या दावोसमधील औद्योगिक कॉन्फरन्स सुरू आहे. ती अत्यंत हास्यास्पद असल्याचं राऊत म्हणाले. अनेक राज्याचे मुख्यमंत्री एकमेकांना देशात न भेटता दावोसला भेटायला जातात, आणि भारतातल्या कंपन्यांनाच दावोसला बोलावून तिथे मुख्यमंत्री करार करतात. तेही जनतेच्या पैशाच्या करावर, अशी टीका राऊतांनी केली आहे, त्याचबरोबर पंतप्रधानांनी यावर लक्ष द्यावं असं आवाहन राऊतांनी केलंय.

