Pune Crime News | पुण्यातील भिगवणमध्ये तरुणीचं अपहरण, हिंदू संघटना आक्रमक
पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. इंदापूर तालुक्यातील गजबजलेल्या भिगवण बाजारपेठेत दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी आपल्या आई आणि भावासोबत खरेदीसाठी आली असताना अचानक दोन तरुणांनी तिच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. या प्रकारामुळे काही क्षण गोंधळ उडाला आणि त्याचा फायदा घेत आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने पळवून नेले.
पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. इंदापूर तालुक्यातील गजबजलेल्या भिगवण बाजारपेठेत दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पीडित तरुणी आपल्या आई आणि भावासोबत खरेदीसाठी आली असताना अचानक दोन तरुणांनी तिच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. या प्रकारामुळे काही क्षण गोंधळ उडाला आणि त्याचा फायदा घेत आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने पळवून नेले. या प्रकरणी झहीर हारून शेख आणि अयान हारून शेख अशी आरोपींची नावे समोर आली असून, त्यांच्याविरोधात भिगवण पोलीस ठाणे येथे अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत सहा विशेष पथके तयार केली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून, विविध टोलनाक्यांवर नाकाबंदी करून संशयित वाहनांची चौकशी सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक तपासाचाही वापर केला जात आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील काही हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. पुणे-सोलापूर रस्ता येथे टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भिगवण पोलीस स्टेशनसमोरही मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झाले होते. घोषणाबाजी करत आरोपींना तत्काळ अटक करावी आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून, सध्या संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता असून, पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे.
Published on: Feb 18, 2026 11:56 AM
सचिन अहिर पहिला बॉम्ब... आता अजून स्फोट होणार!
शरद पवार सत्तेत जाण्याच्या चर्चेदरम्यानच आणखी वेगळंच घडलं! पक्षातील
राजकीय हालाचालींना वेग! संजय राऊतांचं नितेश राणेंना पत्र, थेट म्हणाले
महाराष्ट्राच्या मदतीसाठी केंद्र सरकार सरसावलं; पूरस्थितीवर शाह-फडणवीस

