इंदापूर हादरलं! डोळ्यात लाल तिखट फेकलं अन् आई – भावासमोरच…
पुण्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण बाजारपेठेत एका मुलीचे तिच्या आई-भावासमोर डोळ्यात मिरची पूड फेकून अपहरण करण्यात आले. झहीर हारून शेख आणि अयान हारून शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून, त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. भिगवण शहर बंदची हाक देण्यात आली आहे, तसेच मोर्चाचेही आयोजन केले आहे.
पुण्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भिगवण बाजारपेठेत आई आणि भावासोबत आलेल्या एका वीस वर्षीय मुलीचे डोळ्यात मिरची पूड फेकून अपहरण करण्यात आले. आरोपींनी मुलीच्या आईला मारहाण करून मुलीला पळवून नेले. झहीर हारून शेख आणि अयान हारून शेख अशी अपहरण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. भिगवण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथके रवाना झाली आहेत. विविध टोलनाक्यांवर नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेनंतर स्थानिक हिंदू संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मुलीच्या अपहरणानंतर हिंदू संघटनांनी पुणे-सोलापूर रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. तसेच आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत भिगवण पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी केली. या निषेधार्थ आज भिगवण शहर बंदची हाक देण्यात आली आहे. शिवाय, भिगवण पोलीस ठाण्यासमोर दुपारी चार वाजता हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे, मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे.
Published on: Feb 18, 2026 11:06 AM
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
