Supreme Court | धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी उद्या सुप्रीम कोर्टात होणार आहे. उद्या होणाऱ्या कोर्टाच्या कामकाजाच्या यादीमध्ये या प्रकरणाचा उल्लेख आहे. उद्धव ठाकरेंच्याच बाजूने निर्णय लागेल असा विश्वास ॲड. असीम सरोदे यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी उद्या सुप्रीम कोर्टात होणार आहे. उद्या होणाऱ्या कोर्टाच्या कामकाजाच्या यादीमध्ये या प्रकरणाचा उल्लेख आहे. उद्धव ठाकरेंच्याच बाजूने निर्णय लागेल असा विश्वास ॲड. असीम सरोदे यांनी व्यक्त केला आहे. शिंदेंना आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करायला लागेल असंही सरोदे म्हणतायेत. आता लोकांचा नवीन प्रश्न असा आहे कि जर शिंदेंकडून पक्ष आणि चिन्ह काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? यावर उत्तर देत सरोदे म्हणाले, जर शिंदेंकडून पक्ष आणि चिन्ह काढून घेतला तर शिंदे सेना भाजपमध्ये विलीन होईल आणि एकनाथ शिंदे यांचं राजकीय महत्व एकदम कमी होईल. शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील आणि मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतात असं देखील सरोदे म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे सुरु झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयच कधीतरी संपवेल असा दावा सरोदेंनी केला आहे.

