AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला होणाऱ्या तेल पुरवठ्यावरून रशियाचा मोठा निर्णय, केली मोठी घोषणा; आता काय होणार ?

पश्चिम आशियातील तणावामुळे अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदीस तात्पुरती सूट दिली. याच दरम्यान, रशियाने भारताला होणाऱ्या तेल निर्यातीबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता आणि भूराजकीय परिस्थितीमुळे हा निर्णय महत्त्वाचा ठरतो.

भारताला होणाऱ्या तेल पुरवठ्यावरून रशियाचा मोठा निर्णय, केली मोठी घोषणा; आता काय होणार ?
Image Credit source: Getty Images
| Updated on: Mar 07, 2026 | 10:30 AM
Share

रशियाकडून  (Russia) तेल खरेदीबाबत अनेक निर्बंध भारतावर अमेरिकेने लादले होते. मात्र इराण-इस्रायल-अमेरिका युद्ध सुरू असतानाच, भारताने रशियाकडून तेल खरेदी करावे असं अमेरिकेतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. भारतातील कच्च्या तेलाच्या निर्यातीबाबत रशियाने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारताला पाठवलेल्या तेलाचे प्रमाण, तेलाचा आकडा उघड करणार नाही, असं रशियाने स्पष्ट केलं आहे. सध्याच्या जागतिक परिस्थिती पाहता ही माहिती गुप्त ठेवणे आवश्यक आहे, कारण अनेक देश त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत असं रशियाचं म्हणणं आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि ऊर्जा बाजारपेठेतील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

आकडा लपवण्यामागे खास कारण

रशियाच्या अध्यक्षीय कार्यालयाचे, क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह याबाबत स्पष्टच बोलले. भारताला होणाऱ्या तेल निर्यातीचे आकडे सार्वजनिक केले जाणार नाहीत. ते म्हणाले की, जगभरात असे अनेक लोक आणि देश आहेत जे रशियाच्या ऊर्जा व्यापाराला हानी पोहोचवू इच्छितात. अशा परिस्थितीत निर्यातीचा डेटा गोपनीय ठेवणेच उत्तम, असल्याचं त्यांनी म्हटलं. भारत आणि रशियामधील ऊर्जा व्यापाराबाबत आंतरराष्ट्रीय चर्चा तीव्र झालेली असतानाच पेस्कोव्ह यांचे हे विधान आलं आहे.

अमेरिकेच्या विधानानंतर चर्चेला उधाण

खरं तर, काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट यांनी महत्वाचं विधान केलं होतं. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिफायनरीजना रशियन तेल खरेदी करण्यासाठी तात्पुरती 30 दिवसांची सूट देण्यात आल्याचं ट्विट त्यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर, आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये रशियाकडून भारताला होणाऱ्या तेल पुरवठ्याबद्दल विविध वृत्तं येऊ लागली. याच अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला होता की रशियाकडे भारताला आठवड्यातून अंदाजे 2.2 कोटी बॅरल कच्चे तेल पुरवण्याची क्षमता आहे. मात्र, रशियाने या आकडेवारीची पुष्टी करण्यास नकार दिला.

भारत आणि चीनला वाढू शकतो तेल पुरवठा

रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी संकेत दिले की त्यांचा देश भारत आणि चीनसारख्या प्रमुख ग्राहकांना कच्च्या तेलाचा पुरवठा वाढविण्यास तयार आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल वाहतुकीत अडथळे आल्यामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता वाढली आहे. रशिया आशियाई देशांसोबतचा ऊर्जा व्यापार मजबूत करण्यासाठी एक धोरण अवलंबत असल्याचं दिसून येत आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी