AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचा थेट एकनाथ शिंदेंनाच सवाल, तुम्ही झारीतले शुक्राचार्य… महायुतीत विधान परिषदेवरून भडका

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावा याबाबत विधानसभेत कौल आला आहे. फडणवीस यांच्या नेतृत्त्वात आम्ही जिंकलो आहोत. धंगेकर म्हणाले म्हणून काही होणार नाही. सरकारच्या विरोधात नाराजी असल्याचं रवींद्र धंगेकर म्हणत आहेत. तुम्ही शिवसेनेत आहात की काँग्रेसमध्ये आहात? तुम्ही 12 पक्ष फिरून आला. ज्यांचा इतिहास 12 पक्ष फिरण्याचा आहे. त्यांनी फडणवीस यांच्यावर बोलू नये, असा हल्लाच भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी चढवला आहे.

भाजपचा थेट एकनाथ शिंदेंनाच सवाल, तुम्ही झारीतले शुक्राचार्य... महायुतीत विधान परिषदेवरून भडका
eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 29, 2026 | 11:45 AM
Share

पुणे आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेने सहकार्य केलं नाही म्हणून भाजप आणि राष्ट्रवादीला जागा गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे भाजपचा संतापाच कडेलोट झाला आहे. महायुतीत या पराभवामुळे भडका उडाला आहे. पुण्यातील जागा गमवावी लागल्याने भाजपने थेट शिंदेसेनेवर घणाघाती हल्ला चढवला आहे. शिंदे गटाने आम्हाला सहकार्य केलं नाही. शिंदे सेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या उमेदवाराला पाडण्याचा प्रचार केला. त्यामुळे आमचा पराभव झाला. त्यामुळे एकनाथ शिंदे धंगेकरांवर कारवाई करणार आहे का? त्यांना पक्षातून निलंबित करणार आहे का? झारीतल्या शुक्राचार्यांना धडा शिकवणार आहे का? असे सवालच भाजपने एकनाथ शिंदे यांना विचारले आहेत.

भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सेनेवर घणाघाती हल्ला चढवला आहे. महायुतीत पुण्यात थोडा समन्वय असता तर पुण्याची जागा भाजप जिंकला असता. संभाजीनगरची जागाही राष्ट्रवादीला मिळाली असती. शिवसेनेने पुण्यात सचिन सानप यांना ऐनवेळी पाठिंबा दिला. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे होते. चिवटेंना एबी फॉर्म दिला होता. ऐनवेळी चिवटेंना माघार घ्यायला सांगून सानप यांना पाठिंबा दिला. त्यामुळे भाजपचा उमेदवार पडला, असा दावा नवनाथ बन यांनी केला आहे.

म्हणून पराभव झाला

शिक्षक मतदारसंघात शिंदे गट पुरस्कृत सानप यांना 16 हजार मते पडली. शिक्षक मतदारसंघात जे शिक्षक मतदार असतात. तेच पदवीधरमध्येही मतदान करतात. त्यामुळे सानप यांची ही 16 हजार मते भाजपला ट्रान्सफर झाली असती तर भाजपच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार स्मिता जाधव पहिल्या फेरीत विजयी झाल्या असत्या. पण एका जागेच्या हव्यासापोटी शिंदे गटाने आमचा उमेदवार पडला. शिंदे गटाची ती अधिकृत जागा नव्हती. त्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे एका जागी पराभव झाला, असं बन म्हणाले.

केसाने गळा कापला

पुण्यात शिंदे गटाने भाजपच्या विरोधात काम केलं त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. पुण्यात पदवीधर निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांनी मतदारांना भाजपच्या उमेदवाराला मते देऊ नका, असं आवाहन केलं. धंगेकर हे माजी आमदार आहेत. शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत. स्मिता जाधव यांना मतदान करू नका, असं आवाहन धंगेकर यांनी करून मित्रांनी केसाने गळा कापण्याचा निर्णय घेतला असेल तर शिंदेंनी धंगेकरांवर कारवाई केली पाहिजे. शिक्षक मतदारसंघात तुम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला, ते ठिक आहे. पण पदवीधर मतदारसंघात तुमचा उमेदवार नव्हता. निवडणुकीनंतर जिंकल्यावर धंगेकर यांनी पोस्ट केली. शाब्बस पदवीधरांनो, असं म्हणत त्यांनी भाजपला डिवचलं. धंगेकरांच्या पोस्टचा अर्थ तुम्ही भाजपचं काम केलं नाही. एकनाथ शिंदे यांना प्रश्न आहे. तुमचे महानगर प्रमुख मतदारांना आवाहन भाजप विरोधात आवाहन करत असतील तर हे गंभीर आहे. त्यांच्या विरोधात काय कारवाई करणार? असा सवाल त्यांननी केला.

युती धर्म पाळत असू तर..

महायुती म्हणून आम्ही अमरावतीत शिंदेंच्या उमेदवाराला मदत केली. आमच्या काही लोकांनी बंडखोरी केली. त्यामुळे आम्ही बंडखोरांना सहा वर्षासाठी निलंबित केलं. आम्ही अमरावतीत युती धर्म पाळत असू, आमच्या बंडखोरांवर कारवाई करत असू तर अमरावतीत जी भूमिका घेतली तीच धंगेकरबद्दल शिंदे घेणार आहेत? महायुती पाच जागी निवडून आली असती. पण झारीतल्या शुक्राचार्यांनी भाजपच्या विरोधात भूमिका घेतली. धंगेकर यांच्यावर काय कारवाई करणार आहात? असा सवाल त्यांनी केला.

Follow Us
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांचा आरोप...
महायुतीच्या पराभवानंतर भाजपचा शिवसेनेवर ठपका; नवनाथ बन यांच्या आरोपांनी राजकारणात खळबळ!
भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा....
Anand Paranjpe : भाजपाच्या मराठवाड्यातील नेत्यांनी कुणाचा प्रचार केला, हेही शोधा; आनंद परांजपेंचा पलटवार
रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत?
Navnath Ban : रवींद्र धंगेकर सत्ताधारी पक्षात आहेत की विरोधी पक्षात आहेत? नवनाथ बन यांचा थेट सवाल
एकनाथ शिंदेंनी धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
Navnath Ban : पुणे पदवीधर निवडणुकीवरून महायुतीत ठिणगी; एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांवर कारवाई करावी, नवनाथ बन असं का म्हणाले?
दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्य...
Rice Price Hike : दिवाळीआधी तांदळाच्या दरात किलोमागे एवढ्या रुपयांची वाढ; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार?
Mumbai : मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच मंचावर येणार? चर्चांना उधाण
नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
MLC Election Results : नागपूर-पुण्यातील पराभवानंतर रवींद्र चव्हाण पक्षसंघटनेचा आढावा घेणार
मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP : मोदींना हर्षवायू झाला...; भाजपच्या पराभवावर संजय राऊतांचा खोचक टोला
शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी...
Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष- चिन्ह, आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी; आज सुप्रीम कोर्टात काय घडणार?
महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय
MLC Election Results : महाराष्ट्रात मविआचा झेंडा फडकला; विधान परिषदेच्या 3 जागांवर विजय