सोलापूर शहर प्राचीन काळी सोन्नलागी आणि सोन्नलापूर या नावाने ओळखलं जायचं. कालांतराने या शहराला सोलापूर असे नाव पडले. सोलापूरची खरी ओळख ही गिरणगाव अशीच होती. मुंबईनंतर सोलापूर हेच गिरणीकामगारांचं शहर म्हणून ओळखलं जात. सोलापूरची चादर आणि शेंगा चटणी सातासमुद्रापार पोहोचली आहे. ज्वारीचं कोठार अशीही सोलापूरची ओळख. तसेच, विडी आणि सिगारेट उद्योगात या जिल्हयाचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर, आता सर्वाधिक साखर कारखाने असेलला जिल्हा म्हणून सोलापूर साखर उद्योगात अग्रस्थानी आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या लोकसंख्या 43,17,756 एवढी आहे. जिल्ह्यात 11 तालुके आहेत, ज्यामध्ये एकूण 1144 खेडी आहेत. जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ 14895 वर्ग कि.मी एवढं आहे. सोलापूरात मराठी भाषेसह तेलगू आणि कन्नड भाषाही प्राधान्याने बोलली जाते. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमालगत असलेल्या हा जिल्हा आहे. सिद्धेश्वर मंदिरासह पंढरपूर आणि अक्कलकोट ही प्रसिद्ध तीर्थक्षेत्रही या जिल्ह्याची ओळख आहेत. तर संतांची भूमी म्हणू येथील मंगळवेढा प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यात 2 लोकसभा मतदारसंघ आणि 11 विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात 68 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि 136 पंचायत समिती मतदारसंघ आहेत. बार्शी हा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. विधानसभा मतदारसंघ (11) : मोहोळ, उत्तर सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर शहर, मध्य सोलापूर शहर, अक्कलकोट, पंढरपूर, करमाळा, माढा, सांगोले, माळशिरस, बार्शी, नवीन वैराग तालुका प्रस्तावित आहे. तर सोलापूर महानगरपालिकेत एकूण 102 सदस्य आहेत.
सोलापुरातील जिल्ह्यातील राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही9 मराठीच्या वेबसाईटला आवर्जून भेट द्या.
पंढरपूर येथील मंदिराचा इतिहास, भिंतींवरील मूर्ती आदी गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला जावा. तसेच ते पुरोहितांकडून बौद्ध लोकांच्या हाती द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रदीप ...
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती अॅग्रो’ला भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयास विद्यमान अध्यक्षांकडून डीआरटी न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. त्यामुळे कारखान्याबाबत तालुक्यात पुन्हा चर्चा सुरू ...
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना हटवण्याचा निर्णय राज्य सरकार करत असतील तर आमचा विरोध असेल. तसेच संपूर्ण धनगर समाज बारामती जाऊन आंदोलन करण्याचा इशाराही ...
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना पवार यांच्या बारामती ऍग्रोला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला होता. मात्र ऋण वसुली संचालनालयाकडून पुढच्या सुनावणीपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्यात ...
भगवी वस्त्रे घातली म्हणजे आपल्यालाही मते मिळतील, असे त्यांना वाटत आहे. त्यामुळे हनुमान चालीसा अन् भोंगे तसेच धर्माच्या नावावर राजकारण करण्यापेक्षा त्यांनी चांगले काम करावे, ...
कलिंगड या हंगामी पिकातून चार पैसे पदरात पडतील म्हणून शेतकऱ्यांनी अडीच महिने जोपासना आणि औषधांवर हजारोचा खर्च केला. शिवाय यंदा बाजारपेठा खुल्या असल्याने अधिकचा दर ...
Sadabhau Khot: होय, देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार. तुम्ही पुन्हा आलात की हे गडी पहिल्या डब्यात येतात. त्यामुळे आता तुम्ही पुन्हा आलात की यांना सुट्टी देऊ ...
डाळिंब पिकावर विविध किड रोगराईचा प्रादुर्भाव हा होताच. मात्र, अशा प्रतिकूल परस्थितीमधूनही येथील शेतकरी विक्रमी उत्पन्न घेत असत. पण गेल्या काही वर्षांपासून पिन होल बोरर ...