AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नायक’मधील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर मिळाली राजकारणाची ऑफर, अनिल कपूर यांनी या कारणामुळे दिला होता नकार

Anil Kapoor : अनिल कपूर यांनी अनेक चित्रपटामध्ये संस्मरणीय भूमिका साकारली आहे. आता त्यांनी नायक चित्रपटानंतरचा एक किस्सा सांगितला आहे. ते नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

'नायक'मधील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर मिळाली राजकारणाची ऑफर, अनिल कपूर यांनी या कारणामुळे दिला होता नकार
Anil KapoorImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 15, 2026 | 10:49 PM
Share

अभिनेते अनिल कपूर यांचे नाव बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. ते 1980 च्या दशकापासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. ते आपल्या फिटनेसमुळेही नेहमी चर्चेत राहतात. अनिल कपूर यांनी अनेक चित्रपटामध्ये संस्मरणीय भूमिका साकारली आहे. ‘नायक’ या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही अनेकांच्या डोळसमोर आजही आहे. या चित्रपटात त्यांनी पत्रकाराची भूमिका साकारली होती, परंतु नंतर ते एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनले होते. या चित्रपटातील भूमिकेनंतर त्यांना खऱ्या आयुष्यात राजकारणात येण्याच्या ऑफर आल्या होत्या, मात्र त्यांनी या ऑफर नाकारल्या होत्या. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नायकनंतर मिळाळी राजकारणाची ऑफर

नायक हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनिल कपूर यांच्यासह राणी मुखर्जी, अमरीश पुरी आणि परेश रावल या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या. या चित्रपटात अनिल कपूर एका दिवसासाठी मुख्यमंत्री बनले होते. या एका दिवसात त्यांनी अनेक अशी कामे केली होती, ज्यामुळे ते खूप लोकप्रिय झाले होते. या चित्रपटाबाबत इंडियन एक्सप्रेसच्या एका कार्यक्रमात अनिल कपूर यांनी सांगितले की, हा चित्रपट प्रदर्शित होताच मला राजकीय पक्षांकडून अप्रत्यक्ष ऑफर आल्या होत्या. राजकारणात जाण्याबाबत चर्चा झाली होती, मात्र मी ती तिथेच थांबवली.’ मात्र अनिल कपूर यांनी ही ऑफर कोणत्या पक्षाकडून मिळाली होती याची माहिती दिली नाही.

ऑफर थेट आल्या नाहीत

अनिल कपूर यांनी सांगितले की, ज्या लोकांना ऑफर दिल्या ते हुशार लोक होते, त्यांनी थेट ऑफर दिली नाही. त्यांनी इतर लोकांमार्फत संदेश पाठवला होता. पुढे बोलताना अनिल कपूर यांनी सांगितले की, ‘मला हे स्पष्ट होते की मी या कामासाठी योग्य नाही. जर मी ते केले तर मी ते खरोखर चांगले करेन. पण माझ्यात ते काम करण्याची क्षमता नाही. खरं तर, मी जे काही स्वीकारतो ते 100% पूर्ण करण्याचे धाडस माझ्यात नाही. मला संयुक्त राष्ट्रांनी अनेक वेळा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनण्यास सांगितले आहे. स्लमडॉग मिलेनियरच्या वेळीही ते घडले होते.’

दिखाव्यासाठी राजकारण करायचे नाही

अनिल कपूर यांनी पुढे बोलताना सांगितले की, जेव्हा तुम्ही उच्च पदावर असता तेव्हा जगातील प्रत्येक संस्था तुमच्याकडे येते. मी त्यांना सांगितले की, ‘मला ते दिखाव्यासाठी करायचे नाही. चार फोटो प्रसिद्ध होतात आणि नंतर तुम्ही काहीही करत नाही. जर तुम्हाला काही करायचे असेल तर तुम्हाला ते मनापासून, करावे लागेल.’

Follow Us
काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने....
Nagpur : काळ आला होता पण वेळ आली न्हवती; नागपूर रेल्वे स्थानकात RPF जवानाने प्रवाशाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं...
लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
Aaditya Thackeray Tweet : लोकशाही पुन्हा मिळवण्यासाठी मुंबई सज्ज...; आदित्य ठाकरेंचं ते ट्विट चर्चेत
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद
Thane : ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरणी; आज सर्वपक्षीय नेत्यांची पत्रकार परिषद, नेमकी काय चर्चा होणार?
आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; अय्यरच्या नेतृत्वाखाली...
IND vs PAK Asian Games Final : आज भारत-पाकिस्तानमध्ये फायनल सामन्याचा थरार; श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत करणार का गोल्डन कामगिरी?
मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल....
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त, परवाना थेट..
Dharashiv : येडेश्वरी खवा सेंटरला FDAचा मोठा दणका; 125 किलो खवा जप्त अन्, परवाना थेट...
मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं....
tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर....
Abhijeet Dipke : तारीख ठरली, ज्ञानेश कुमारांनी राजीनामा दिला नाही तर पुन्हा दिल्लीत आंदोलन भडकणार?; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल