मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गट मोठ्या संकटात, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाराजी भोवली
राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली असून, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीचा निकाल आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात झालेल्या युती, आघाड्यांमुळे अनेक पक्षातील निष्ठावंतांचं तिकीट ऐनवेळ कापलं गेल्यामुळे सर्वच पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात नाराजी दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग झालं आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी निष्ठावंतांना डावलण्यात आल्यानं नाराजीचा सूर आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटानं मुंबईत मनसेसोबत तर काही ठिकाणी इतर पक्षांसोबत देखील युती केली आहे. सोलापुरातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
सोलापुरात शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठी बंडाळी पहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या विरोधात 100 पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. शहरप्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. “जिल्हाप्रमुख अजय दासरी हटाव शिवसेना बचाव” असा नारा देत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राजीनामा दिला आहे. हा ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
अजय दासरी यांनी पक्षातील तिकीट विकले आहेत, असा आमचा आरोप आहे. मनमानी कारभाराला कंटाळून आम्ही राजीनामे देत आहोत. जोपर्यंत अजय दासरी यांना हटवलं जात नाही, तोपर्यंत आम्ही पदावर काम करणार नाही. आम्ही कट्टर शिवसैनिक असूनही, आम्हाला डावलून, उपऱ्या शिवसैनिकांना पक्षात घेऊन तिकीट दिले असा आरोप यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पहाणं? महत्त्वाचं ठरणार आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
