सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
छत्रपती संभाजीनगर येथे हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतानसोबत तुलना केल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने केली. सपकाळ यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास करावा, असे आवाहन करत त्यांच्या वक्तव्याला काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी म्हटले. याप्रकरणी जाहीर माफीची मागणी करत, माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर येथे भाजपच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमहापौरांच्या केबिनमध्ये टिपू सुलतानाचा फोटो लावून छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतानसोबत तुलना केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. ही तुलना निंदनीय असल्याचे सांगत, महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसल्याची टीका अतुल सावे यांनी केली.
आंदोलकांचे म्हणणे आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांच्यामुळेच स्वराज्य मिळाले, तर टिपू सुलतान धर्मांतर करणारा, महिलांवर अत्याचार करणारा आणि अनेकांवर प्राणघातक हल्ले करणारा शासक होता. त्यामुळे दोघांची बरोबरी करणे अयोग्य आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करत, माफी न मागितल्यास आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. काँग्रेसच्या या भूमिकेला वैचारिक दिवाळखोरी संबोधून निषेध व्यक्त करण्यात आला.
Published on: Feb 15, 2026 02:01 PM
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
