काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
श्रीकांत शिंदे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. काँग्रेस मतांच्या राजकारणासाठी नेहमीच असे वक्तव्य करते, ज्यामुळे महाराष्ट्रात आणि देशात पक्षाची अधोगती झाली आहे, असे शिंदे म्हणाले. विशिष्ट जाती-धर्माच्या मतपेढीसाठी काँग्रेसचे धोरण जबाबदार असल्याचा त्यांचा दावा आहे.
शिवसेनेचे नेते श्रीकांत शिंदे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ते म्हणाले की, सपकाळ यांच्या वक्तव्याचा जेवढा निषेध करू तेवढा कमीच आहे. शिंदे यांनी काँग्रेसच्या धोरणांवरही टीका केली. त्यांच्या मते, काँग्रेस पक्ष मतांच्या राजकारणासाठी नेहमीच विशिष्ट समुदाय किंवा धर्माला लक्ष्य करून अशी वक्तव्ये करत आला आहे. याच कारणामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात काँग्रेसची राजकीय अधोगती झाली आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी नमूद केले.
गेले अनेक वर्षांपासून काँग्रेसने विशिष्ट जाती, समुदाय आणि धर्माच्या मतपेढीसाठी जी धोरणे आणि धारणा ठेवली आहे, तीच त्यांची संस्कृती बनली आहे. काँग्रेसच्या याच पद्धतीमुळे त्यांची विश्वासार्हता कमी झाली असून, पक्षाला मोठा फटका बसला आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका

