तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात थांबून डॉक्टरांशी चर्चा केली. सध्या तेजस यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांना प्रकृती अस्वस्थतेमुळे मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृती ठीक नसल्यामुळे तेजस यांना बुधवारी सायंकाळी रुग्णालयात आणण्यात आले.
बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन तेजस यांच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून माहिती घेतली. तसेच, काल रात्री उद्धव ठाकरे रुग्णालयातच थांबले होते. डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर आज दुपारी उद्धव ठाकरे मातोश्रीवर परतले. सध्या तेजस ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे. त्यांना उद्या किंवा परवा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तेजस ठाकरे यांच्या उपचारांवर डॉक्टर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका

