आजची धावपळ आणि ताणतणाव तसेच व्यायामाच्या कमतरतेमुळे उच्च रक्तदाबाची समस्या कॉमन झाली आहे.त्यामुळे हृदय,किडनी आणि मेंदूवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे काही पदार्थ खाऊ नयेत.
हाय बीपीत जास्त मीठ खाऊ नयेत.खारट पदार्थ,आचार,पापड आणि प्रोसेस्ड फूडमध्ये लपलेल्या सोडियममुळे ब्लडप्रेशर वाढून हार्टवर अतिरिक्त प्रेशर येते.
समोसे, फ्रेंच फ्राईज, बर्गर आणि भज्या सारखे तळलेल्या पदार्थात ट्रान्स फॅट जास्त असते. जे नसांना कडक करते आणि ब्लड प्रेशर वाढते.
केक,पेस्ट्री, मिठाई आणि कोल्ड ड्रींकमधील जास्त साखर वजन वाढवते.त्यामुळे लठ्ठपणा, हायबीपीला निमंत्रण मिळते.यामुळे गोडपदार्थांपासून दूर रहावे.
रेड मीठ, सॉसेज आणि सलामी सारख्या प्रोसेस्ड मांसात सॅच्युरेटेड फॅट आणि मीठ जादा असते.ज्याने कोलेस्ट्रॉल वाढून हायबीपी आणखी वाढू शकतो.
जास्त मद्य पिणे तसेच चहा-कॉफीचे जादा सेवन केल्याने बीपी अचानक वाढू शकतो.हृदयाचे ठोके त्यामुळे वाढतात.त्यामुळे हाय बीपीच्या रुग्णांना यांपासून दूर राहावे.
डबाबंद सुप,इंस्टन्ट नुडल्स आणि पॅकबंद स्नॅक्समध्ये प्रिझंर्वेटिव्स आणि सोडियम जास्त असते. ज्यामुळे बीपी शुट होऊ शकतो.