वापर झालेल्या ग्रीन टी बॅगचा असाही उपयोग होतो, 5 बेस्ट उपाय पाहा

Created By: Atul Kamble

 14 FEB 2026

ग्रीन टीमुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच अनेक फायदे यापासून मिळतात.

 वापर झालेल्या ग्रीन टी बॅगचे अनेक फायदे असतात. त्या फेकू नका हे उपाय करा

वापर झालेल्या टी बॅग फ्रिझमध्ये ठेवा त्यामुळे फ्रिजमधील कुबट वास दूर होईल.

दिवसभर काम केल्याने डोळ्यांना थकवा येतो. ग्रीन टी बॅग थंड करुन पापण्यांवर अलगद ठेवल्या तर डार्क सर्कलही कमी होतात.

वापर झालेल्या टी बॅग कोमट पाण्यात टाकून त्या पाण्यात पाय बुडवा, त्याने त्वचे नवा तजेला येईल आणि पायांची दुर्गंधी दूर होईल.

वापर झालेल्या टी बॅग्स पुन्हा एकदा नीट उकळा आणि त्याने केस धुवा, त्यामुळे केसांना नैसर्गिक चमक मिळेल.

 ग्रीन टी बॅग्सचा खत म्हणून झाडांच्या कुंडीत उपयोग करता येतो.