जीवनात या 6 परिस्थितीत शांत बसणेच उत्तम असते, केव्हा वाचा
Created By: Atul Kamble
10 FEB 2026
अनेकदा कम्युनिकेशन असणे चांगले असते. बोलण्यातून अनेक गोष्टी उलगडू शकतात. परंतू जीवनात अनेकदा अशी स्थिती असते तेव्हा शांत बसणे उत्तम असते.
जर तुम्हा एखाद्या गोष्टीवर खूप राग येत असेल तर त्यावेळी शांत बसणे उत्तम असते. कारण रागात घेतलेला निर्णय अनेकदा चुकीचा असतो. त्यावेळी उलटे 10 आकडे मोजा राग निघून जाईल.
खूप आनंदात असाल त्यावेळी कोणतेही वचन देऊ नका. अनेकदा भावावेगात जी गोष्ट आपण पूर्ण करु शकणार नाही असे वचन देतो, आणि नुकसान होते.
जर कोणाशी भांडण झाले असेल तर त्यावेळी वातावरण तप्त झालेले पाहून शांत रहावे, मग तुम्ही त्या वादात सहभागी असाल किंवा नसाल. केवळ शांत बसा
काही वेळा शांत पणे दुसऱ्याचे ऐकणे गरजेचे असते. खास करुन महत्वाची माहिती किंवा भावनिक गोष्ट कोणी सांगत असेल तेव्हा शांत ऐकणे गरजेचे असते.
मुलाखतीच्या वेळी पॅनलचे लोक परस्परात बोलत असतील तेव्हा शांत बसणे योग्य असते. ही गोष्ट तुमची धैर्य आणि थॉटफुलनेस दाखवतात.
आपल्याला कोणाकडून काही माहिती जाणून घ्यायची असेल शांत व्हायला हवे. वास्तविक लोक एखाद्याचे मौन तोडायचे असेल त्यास खूप समजवण्याचा प्रयत्न करतात.बोलता बोलता सत्य सांगून बसतात. जे सर्वसाधारण पणे सांगायचे नसते.
जर कोणी तुमच्यावर टीका करत असेल तर लगेच उत्तर न देता त्यावेळी शांत बसणे उत्तम असते. ही शांतता तुम्हाला योग्य उत्तर देण्याची ताकद देते.