AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 Points Table: पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, सुपर 8 फेरीचं गणित चुकलं; आता…

CC Men’s T20 World Cup 2026 Match Points Table:भारताने साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला. यासह सुपर 8 फेरीत जागा पक्की केली आहे. मात्र पाकिस्तानचं गणित मात्र बिघडलं आहे. आता शेवटच्या सामन्यात करो या मरोची स्थिती आली आहे.

T20 World Cup 2026 Points Table: पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, सुपर 8 फेरीचं गणित चुकलं; आता...
T20 World Cup 2026: पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, सुपर 8 फेरीचं गणित चुकलं; आता...Image Credit source: Icc X account
| Updated on: Feb 15, 2026 | 10:53 PM
Share

आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर इथेच गणित चुकलं. इशान किशनचं वादळ घोंघावलं आणि सामन्याचं चित्र बदललं. इशान किशनच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकात 7 गडी गमवून 175 धावा केल्या आणि विजयासाठी 176 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना पाकिस्तानने 114 धावांवरच नांगी टाकली. भारताने हा सामना जिंकला आणि सुपर 8 फेरीतील स्थान पक्कं केलं. पण या पराभवाने पाकिस्तानची वाट बिकट झाली आहे. पाकिस्तानला आता चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात काहीही करून विजय मिळवावाच लागेल. कारण पराभूत झाल्यानंतर नेट रनरेट काही सुधारणार नाही. त्यामुळे अमेरिकेला सुपर 8 फेरीत जागा मिळेल. सध्या गुणतालिकेची स्थिती पाहता तसंच गणित आहे.

भारत पाकिस्तान सामना होण्यापूर्वी पाकिस्तानचा संघ चांगल्या स्थितीत होता. गुणतालिकेत अधिक नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर होता. पण भारताने 61 धावांनी पराभूत करतात गुणतालिकेत मोठा बदल झाला. पाकिस्तानची थेट दुसऱ्या स्थानावर तिसऱ्या स्थानावर घसरण झाली. इतकंच काय तर नेट रनरेट हा -0.403 इतका झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानला आता सुपर 8 फेरीत जागा मिळवायची असेल तर नामिबियाला पराभूत करणं गरजेचं आहे. कारण अमेरिका दुसऱ्या स्थानावर असून 4 गुण आणि नेट रनरेट हा +0.787 इतका आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला असून 6 गुण आणि +3.050 नेट रनरेट आहे. तर सुपर 8 फेरीत स्थान पक्कं केलं आहे.

भारताचा शेवटचा सामना नेदरलँडशी होणार आहे. या सामन्याचा तसा काही गुणतालिकेवर फरक पडणार नाही. हा सामना नेदरलँड तर जिंकणार नाही. कारण भारताचा फॉर्म पाहता तसं होणं शक्य नाही. पण समजा तसं झालं आणि नेदरलँड जिंकला तर नेट रनरेटचं गणित काही सुटणार नाही. त्यामुळे सुपर 8 फेरीसाठी अमेरिका आणि पाकिस्तान या दोन संघांना संधी आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि नामिबिया सामना करो या मरोची स्थिती आहे. पाकिस्तानने हा सामना गमावला तर अमेरिका थेट सुपर 8 फेरीत जागा पक्की करेल. त्यामुळे आता पाकिस्तान नामिबिया सामन्याचं महत्त्व वाढलं आहे.

Follow Us
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी