AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात लावा ही पाच पेंटिंग, नशीब चमकेल, घरात येईल सुख समृद्धी

वास्तुशास्त्रामध्ये काही छायाचित्र हे अतिशय शुभ माण्यात आले आहेत. हे छायाचित्र तुम्ही जर घरात लावले तर तुमच्या घरात सतत सकारात्मक ऊर्जा राहाते, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

Vastu Shastra : घरात लावा ही पाच पेंटिंग, नशीब चमकेल, घरात येईल सुख समृद्धी
Vastu ShastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 9:44 PM
Share

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दल तर माहिती देण्यातच आली आहे. परंतु त्याचसोबत असे देखील काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमच्या घरात सुख, समृद्धी येईल, तुमच्या प्रगतीच्या मार्गातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होतील. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तेव्हा तुमच्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू होते. नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार असे काही छायाचित्र असतात, ज्यामुळे तुमच्या घरात सतत सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते, आज आपण अशाच काही पेंटिंगस् बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

धावत्या घोड्याचं चित्रं – वास्तुशास्त्रानुसार पाच किंवा सात धावत्या घोड्याचं चित्र घरात लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी या घोड्याचं तोंड नेहमी पूर्व दिशेला असावं.

उगवत्या सूर्याचं चित्र – वास्तुशास्त्रानुसार घरात उगवत्या सूर्याचं चित्र असावं, उगवता सूर्य हा ऊर्जा आणि प्रगतीचं प्रतिक आहे. त्यामुळे घरात उगवत्या सूर्याचं चित्र लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राधा -कृष्णाचा फोटो – जर पती-पत्नीचं पटत नसेल, घरात सारखे भांडणं होत असतील तर वास्तुशास्त्रामध्ये राधा- कृष्णाचा फोटो लावण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

लक्ष्मी मातेचा फोटो – घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती असावी असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. लक्ष्मी मातेचा फोटो हा नेहमी देवघरातच ठेवावा.

कुबेराचा फोटो- वास्तुशास्त्रानुसार घरात कुबेराचा फोटो असणं हे शुभ मानलं जातं. तुमच्या घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीला कुबेराचा फोटो असावा, यामुळे घरात धन संपत्ती येते, असं वास्तुशास्त्र सांगतं. तसेच तुमच्यावर जर कर्ज असेल तर ते देखील हळुहळु कमी होतं, असा दावाही करण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ