AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना शिंदे गट नाराज, भाजपाला थेट इशारा, महायुतीमध्ये वातावरण तापलं, मोठं कारण समोर

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गट भाजपावर चांगलाच नाराज झाला असून, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्याकडून भाजपाला थेट इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे.

शिवसेना शिंदे गट नाराज, भाजपाला थेट इशारा, महायुतीमध्ये वातावरण तापलं, मोठं कारण समोर
शिवसेना नाराज Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 9:20 PM
Share

भाजपने शिंदेंच्या शिवसेनेतच पुन्हा एकदा ऑपरेशन लोट्स केलं आहे. पालघरमध्ये माजी आमदार श्रीनिवास वनगा यांचा भाजपत पक्षप्रवेश झाला आहे. विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये झाला. रविंद्र चव्हाण पालघर दौऱ्यावर असताना  वनगा यांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला.  महापालिका निवडणुकीच्या वेळी शिंदेची शिवसेना आणि भाजपात नगरसेवकांची फोडाफोडी झाली होती. त्यानंतर वाद टोकाला पोहोचताच एकमेकांचे नेते घ्यायचे नाहीत असं ठरलं होतं. पण आता रविंद्र चव्हाणांनी शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार श्रीनिवास वनगा यांना भाजपात घेतलं आहे.  त्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंतांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. नोंद घेतलेली आहे, असा सूचक इशारा सामंत यांनी भाजपला दिला आहे.  भाजपचा धक्का वगैरे काही नाही, आम्ही टांगा पलटी करतो हे माहिती आहेना? असंही यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना श्रीनिवास वनगांनी घरवापसी झाल्याचं म्हटलं आहे.  भरकटलो होतो पण आता स्वगृही आलो आहे,  असंही ते यावेळी म्हणाले आहेत. हे तेच वनगा आहेत. जे शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर  त्यांना साथ देत गुवाहाटीत गेले होते. पण विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी त्यांचंच तिकीट कापलं आणि राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. विद्यमान आमदार असताना तिकीट कापल्याने वनगा रडत रडत नॉटरिचेबलही झाले होते, आणि शिंदेंना साथ दिल्याने पश्चाताप होत असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं होतं.

पण यानंतर वनगांची मनधरणी करुन त्यांचं पुनर्वसन केलं जाईल, असं आश्वासन देण्यात आलं होतं. पण त्यांना संधी न मिळाल्याने अखेर श्रीनिवास वनगांनी भाजपात प्रवेश केला आहे.   श्रीनिवास वनगांना भाजपात घेतल्याने शिंदेंच्या शिवसेनेनं नाराजी व्यक्त केलेलीच आहे. परंतु एकमेकांचे नेते पक्षात घ्यायचे नाहीत, हा अलिखीत करार भाजपने का मोडला ? यावर अद्याप एकनाथ  शिंदे आणि रविंद्र चव्हाणांची प्रतिक्रिया आलेली नाही.

Follow Us
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ