AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशोदा हॉस्पिटल्सतर्फे हैदराबादमध्ये आरोग्यविषयक गोलमेज परिषदेचे आयोजन

निरोगी आयुष्य, जीवनाचा दर्जा, वैयक्तिक आरोग्य आणि कर्मचारी कल्याणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने यशोदा हॉस्पिटल्सच्या वतीने हैदराबादमधील हायटेक सिटी कॅम्पसमध्ये ‘द वेलबीइंग राउंडटेबल – अॅडिंग लाइफ टू इयर्स’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यशोदा हॉस्पिटल्सतर्फे हैदराबादमध्ये आरोग्यविषयक गोलमेज परिषदेचे आयोजन
yashoda hospitals
| Updated on: Nov 19, 2026 | 9:10 PM
Share

निरोगी आयुष्य, जीवनाचा दर्जा, वैयक्तिक आरोग्य आणि कर्मचारी कल्याणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने यशोदा हॉस्पिटल्सच्या वतीने हैदराबादमधील हायटेक सिटी कॅम्पसमध्ये ‘द वेलबीइंग राउंडटेबल – अॅडिंग लाइफ टू इयर्स’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय, कॉर्पोरेट, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग घेत आरोग्य, दीर्घायुष्य आणि आधुनिक जीवनशैलीतील निरोगी राहण्याचे महत्त्व यावर आपले विचार मांडले.

प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते विजय देवरकोंडा तसेच हार्टफुलनेसचे जागतिक मार्गदर्शक कमलेश डी. पटेल (दाजी) यांची या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली होती. ऑलिम्पिक पदकविजेती आणि जागतिक स्पर्धेतील विजेती पी. व्ही. सिंधू विशेष पॅनेल सदस्य म्हणून सहभागी झाल्या.

हैदराबादमधील ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCCs) मधील सीईओ, वरिष्ठ अधिकारी, विभागप्रमुख, व्यवस्थापक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नेत्यांसह सुमारे ५०० निमंत्रितांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. आजारांवरील उपचारांपुरते आरोग्यसेवेचे उद्दिष्ट मर्यादित न ठेवता प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर भर देणे, दीर्घायुष्याबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे आणि कर्मचाऱ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य जपणे, या मुद्द्यांवर प्रामुख्याने चर्चा झाली.

दीर्घायुष्यविषयक संशोधनातील नवे निष्कर्ष, आरोग्य संस्थांची भूमिका, संशोधनाधारित उपचार पद्धतींचे वैद्यकीय प्रमाणीकरण आणि कॉर्पोरेट संस्थांमध्ये निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी राबवता येणारे उपक्रम, अशा विविध विषयांवर यावेळी विचारमंथन करण्यात आले.

यशोदा हॉस्पिटल्सचे अध्यक्ष जी. रवींदर राव स्वागतपर भाषणात म्हणाले, “उशीरा निदान झाल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हे आम्ही यशोदा हॉस्पिटल्समध्ये दररोज पाहतो. या वेलबीइंग राउंडटेबलच्या माध्यमातून उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. निरोगी कार्यस्थळे आणि निरोगी समाज घडवण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील लीडरसोबत काम करण्याची आमची इच्छा आहे.”

यशोदा हॉस्पिटल्सचे संचालक डॉ. अभिनव गोरुकांती म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर भारतातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान दुपटीहून अधिक वाढले आहे. मात्र, या वाढलेल्या आयुष्यातील दहा वर्षांपेक्षा अधिक काळ भारतीयांना खराब आरोग्यस्थितीत घालवावा लागत आहे. आमच्या रुग्णालयातील आकडेवारीनुसार, जीवनशैलीशी संबंधित आजार आता तिशी आणि चाळिशीतील व्यक्तींमध्येही दिसून येत आहेत. वैद्यकीय उपचार आयुष्यातील वर्षे वाढवू शकतात; मात्र प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा त्या वर्षांना अधिक चांगले जीवन देऊ शकते. दैनंदिन कार्यसंस्कृतीचा भाग म्हणून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा रुजवण्यात कॉर्पोरेट क्षेत्रातील नेत्यांची भूमिका महत्त्वाची आहे.”

प्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते विजय देवरकोंडा म्हणाले, “आयुष्यात यश मिळवणे महत्त्वाचे आहेच; पण त्याचबरोबर निरोगी राहणेही तितकेच आवश्यक आहे. आपण कितीही व्यस्त असलो, तरी आपल्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक शांतता यांचा समावेश असलेली जीवनशैली आपले आयुष्य अधिक निरोगी आणि आनंदी बनवू शकते. प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची आणि कल्याणाची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे.”

खरे आरोग्य केवळ शारीरिक तंदुरुस्तीपुरते मर्यादित नसते. शरीर, मन आणि भावना यांच्यात संतुलन असणे आवश्यक आहे. ध्यानधारणा, सकारात्मक विचार आणि निरोगी सवयी आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. केवळ दीर्घायुष्य मिळवणे पुरेसे नाही, तर जीवनात शांतता, आनंद आणि गुणवत्ताही जपली पाहिजे असे हार्टफुलनेसचे जागतिक मार्गदर्शक कमलेश डी. पटेल (दाजी) यांनी यावेळी सांगितले.

“खेळाडूच्या आयुष्यात आरोग्य, शिस्त आणि सातत्यपूर्ण सराव यांना अत्यंत महत्त्व आहे. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक सामर्थ्यही यशाचा भक्कम आधार असते. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी विश्रांती यांना प्राधान्य दिले पाहिजे. दीर्घकालीन यशाचा मार्ग निरोगी जीवनशैलीतूनच जातो.” असे यावेळी ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधू  यांनी सांगितले.

पारंपरिक आरोग्यसेवेच्या चौकटीपलीकडे जाऊन यशोदा हॉस्पिटल्सने आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य, दीर्घायुष्य आणि सर्वांगीण कल्याण यांना प्रोत्साहन देण्यात कार्यस्थळांची भूमिका काय असू शकते, यावर कॉर्पोरेट क्षेत्रातील नेत्यांना चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांमध्ये विचारांची देवाणघेवाण आणि परस्पर सहकार्याला चालना देतानाच, वैज्ञानिक आधार असलेल्या निरोगी जीवनशैलीच्या पद्धती संस्थात्मक पातळीवर कशा राबवता येतील, यावरही या चर्चेत भर देण्यात आला. यातून अधिक निरोगी आणि उत्पादक कर्मचारीवर्ग घडवण्याचा संदेश देण्यात आला.

Follow Us
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; निकालानंतर...
Mahesh BaldI : भाजप आमदार महेश बालदींना तीन वर्षांची कारावासाची शिक्षा; मात्र निकालानंतर...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय काय?
Maharashtra Drought : आधी पाणी, मग सुशोभीकरण; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्ष..
Shivsena : BJP : शिंदे सेनेला सोडचिठ्ठी, भाजपमध्ये प्रवेश! त्या बड्या नेत्याच्या पक्षबदलाने पालघरच्या राजकारणात खळबळ
शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना....
Eknath Shinde : हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, शिंदेंचा प्रवासाचा प्लॅन बदलला; पंढरपुरातून रस्तेमार्गे पुण्याकडे रवाना
शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन...
Pune : बाळासाहेबांचा अवमान सहन करणार नाही...; शायना एन.सी. यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं आंदोलन
शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
Shivsena Supreme Court Hearing : शिवसेना पक्ष, चिन्हासंदर्भात आजची सुनावणी संपली; पुढील सुनावणी कधी?
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ