AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा आणि सेटिंग करून भाजपचे..खासदार प्रणिती शिंदेंवर बड्या नेत्याचा गंभीर आरोप

"यांची भाजपसोबतची नाती खूप आतपर्यंत आहेत. 2 ते 3 महिन्यांपूर्वी सुशील कुमार शिंदे यांची नात दिया श्रॉफच्या लग्नात शरद पवार,गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस हे तीन चीफ गेस्ट होते"

तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा आणि सेटिंग करून भाजपचे..खासदार प्रणिती शिंदेंवर बड्या नेत्याचा गंभीर आरोप
Praniti Shinde
| Updated on: Jan 05, 2026 | 9:57 AM
Share

वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंवर गंभीर आरोप केले आहेत. “महापालिका निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे या भाजपमध्ये जाणार. प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डील झालीय” सुजात आंबेडकरांनी असा दावा केला आहे. “आपल्या विरोधात भाजप आहे आणि आरएसएस जर निवडणूक लढवत असती तर त्यांना तिकडेही हरवलं असतं.आपल्या विरोधात भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूला ही भाजपच आहे. कारण प्रणिती शिंदे ह्या भाजपसाठी काम करतात हे सर्वांना माहितीय” असा आरोप सुजात आंबेडकरांनी केला.

“या निवडणूकीच्या आधी प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या, ऑक्टोबर महिन्यातच त्या प्रवेश करणार होत्या. मात्र,देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितलं की,थांबा तीन महत्वाच्या निवडणुका येतायत,नगरपालिका,महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतायत. तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा आणि सेटिंग करून भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणा” असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला. सुजात आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा आहे.

दिया श्रॉफच्या लग्नात शरद पवार,गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस हे तीन चीफ गेस्ट

“त्यानंतर प्रणिती ताई काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश करतील अशी प्रणितीताई आणि देवेंद्र फडणवीस यांची डील झालेली आहे. तुम्हाला भाजपला पाडायचा असेल तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय तुमच्या समोर आहे” असं सुजात आंबेडकर म्हणाले. “यांची भाजपसोबतची नाती खूप आतपर्यंत आहेत. 2 ते 3 महिन्यांपूर्वी सुशील कुमार शिंदे यांची नात दिया श्रॉफच्या लग्नात शरद पवार,गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस हे तीन चीफ गेस्ट होते” असं सुजात आंबेडकर म्हणाले.

यांचे बिजनेस एक, यांची लग्न एक

“हे भाजप आणि काँग्रेस समोरासमोर EVM आणि रस्त्यावर लढायचं नाटक करतात. मात्र यांचे बिजनेस एक, यांची लग्न एक, यांचे नातेगोते एक यांचे सर्व धंदे एक आणि प्रणिती ताईने प्रवेश घेतला की यांचा पक्ष सुद्धा एक. म्हणून काँग्रेसच्या नादाला लागू नका,तुम्ही काँग्रेसला मत दिलं म्हणजेच भाजपाला मत दिल्यासारखं होतं” असं सुजात आंबेडकर यांनी म्हटलं. “हे मी अख्ख्या महाराष्ट्राच्या काँग्रेस बद्दल बोलत नसून तुमच्या सोलापूर बद्दल बोलत आहे. कारण सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार या भाजपसाठी काम करतात हे अख्या जगाला कळून चुकलं आहे” असा सुजात आंबेडकर म्हणाले.

4 मुलं जन्माला घाला... 'ओवैसींना पाकमध्ये पाठवावं नवनीत राणांची मागणी'
4 मुलं जन्माला घाला... 'ओवैसींना पाकमध्ये पाठवावं नवनीत राणांची मागणी'.
ठाकरे बंधूंची मुंबईत एकच भव्य सभा, कधी अन कुठं? राऊतांकडून मोठी माहिती
ठाकरे बंधूंची मुंबईत एकच भव्य सभा, कधी अन कुठं? राऊतांकडून मोठी माहिती.
VIDEO : भाषण करताना नारायण राणे यांना भोवळ, शेकडो लोकांसमोर....
VIDEO : भाषण करताना नारायण राणे यांना भोवळ, शेकडो लोकांसमोर.....
लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा!
लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा!.
नारायण राणे यांचे भर भाषणात निवृत्तीचे संकेत अन् पत्नी नीलम राणे भावूक
नारायण राणे यांचे भर भाषणात निवृत्तीचे संकेत अन् पत्नी नीलम राणे भावूक.
लाडक्या बहिणी मालामाल होणार, CM फडणवीसांची थेट मोठी घोषणा
लाडक्या बहिणी मालामाल होणार, CM फडणवीसांची थेट मोठी घोषणा.
अमित साटम अंधेरीचे डोनाल्ड डक अन् त्यांच्यात पाकड्यांचा DNA
अमित साटम अंधेरीचे डोनाल्ड डक अन् त्यांच्यात पाकड्यांचा DNA.
5 हजारांची साडी 199 रूपयांना... भन्नाट ऑफरनं महिलांची उडाली झुंबड अन्
5 हजारांची साडी 199 रूपयांना... भन्नाट ऑफरनं महिलांची उडाली झुंबड अन्.
मी धनुभाऊंना परळी देऊन टाकली, पंकजा मुंडेंच्या विधानानं चर्चेला उधाण
मी धनुभाऊंना परळी देऊन टाकली, पंकजा मुंडेंच्या विधानानं चर्चेला उधाण.
आव्हाडांमुळेच आघाडीत मिठाचा खडा, काँग्रेसच्या नेत्याच्या आरोपानं खळबळ
आव्हाडांमुळेच आघाडीत मिठाचा खडा, काँग्रेसच्या नेत्याच्या आरोपानं खळबळ.