Jitendra Awhad | अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; जितेंद्र आव्हाडांनी जळालेल्या ब्लॅक बॉक्सवर उपस्थित केले प्रश्न
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमानतळाजवळील धावपट्टीवर झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघातात अजित पवारांसह चार इतर सहकाऱ्यांचा देखील मृत्यू झाला. विमान अपघात हा घातपात की नेमका अपघात याबाबत अनेकांकडून शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठ्या शंका व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, ब्लॅक बॉक्स जळून गेला ही सर्वात मोठी शंका आहे.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमानतळाजवळील धावपट्टीवर झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघातात अजित पवारांसह चार इतर सहकाऱ्यांचा देखील मृत्यू झाला. विमान अपघात हा घातपात की नेमका अपघात याबाबत अनेकांकडून शंका व्यक्त केली जात आहे आणि सध्या चौकशी देखाल सुरु आहे.
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठ्या शंका व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, ब्लॅक बॉक्स जळून गेला ही सर्वात मोठी शंका आहे. ब्लॅक बॉक्स टायटेनियमचा बनलेला असल्याने उष्णतेपासून सुरक्षित असतो आणि साधारणपणे तो जळत नाही. तसेच या विमानाला भारतात उडण्याची परवानगी नव्हती आणि 5000 तासापेक्षा जास्त उडू नये असे नियम असूनही, हे विमान 8 हजार तासापर्यंत उडले होते.
जितेंद्र आव्हाड यांनी DGCA आणि विमान कंपनीवर देखील प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, कंपनी कोणाची आहे, कोणत्या पैशाने चालते, DGCA अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत, हे सर्व तपासण्याची गरज आहे. त्यांनी ब्लॅक बॉक्स जळल्याच्या कारणावरही संशय व्यक्त केला आणि या प्रकरणात पूर्ण चौकशीची मागणी देखील केली. या मुद्द्यावरून आजपासून सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही चर्चा होण्याची शक्यता आहे.
Published on: Feb 23, 2026 01:34 PM
हैराण करणारी बातमी! मित्र मित्र म्हणत अमेरिकेचा भारताला पुन्हा दणका,
महायुतीचे 17 अधिकृत उमेदवार कोण? नावे जाहीर, बंडखोरांना सक्त इशारा काय
शिवसेना विलिनीकरणावर अब्दुल सत्तारांचे खळबळजवक वक्तव्य, थेट म्हणाले...
मतांच्या गणितात आम्ही…अनिल कदमांचं बेधडक विधान नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट

