AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis | माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना देवेंद्र फडणवीस भावूक

Devendra Fadnavis | माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना देवेंद्र फडणवीस भावूक

| Updated on: Feb 23, 2026 | 2:36 PM
Share

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला. या वेळी मुख्यमंत्री भावनिक झाले. यावेळी त्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देतानाच अजितदादांच्या कार्याचा गौरवही केला. “कधीही असा विचार केला नव्हता की अशा प्रकारचा शोकप्रस्ताव मला मांडावा लागेल. सहज बाजूला नजर गेली, बाजूला दादा असायचे आणि सभागृहामध्ये सुरवातीपासून रात्री उशिरापर्यंत कितीही काळ सभागृह चाललं तरी आपल्या जागी बसलेले दादा आपल्याला पाहायला मिळायचे. आज दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत, याची निश्चितपणे खंत आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला. या वेळी मुख्यमंत्री भावनिक झाले. यावेळी त्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देतानाच अजितदादांच्या कार्याचा गौरवही केला.

“कधीही असा विचार केला नव्हता की अशा प्रकारचा शोकप्रस्ताव मला मांडावा लागेल. सहज बाजूला नजर गेली, बाजूला दादा असायचे आणि सभागृहामध्ये सुरवातीपासून रात्री उशिरापर्यंत कितीही काळ सभागृह चाललं तरी आपल्या जागी बसलेले दादा आपल्याला पाहायला मिळायचे. आज दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत, याची निश्चितपणे खंत आहे. मी माझा जवळचा एक मित्र गमावला आहे,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अर्थसंकल्पीय पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, “यावर्षी दादांनी 12 वा अर्थसंकल्प मांडला असता आणि पुढच्यावर्षी तेरावा अर्थसंकल्प मांडून शेषराव वानखेडे यांचा विक्रम साधला असता. कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री म्हणून दादाचं नाव नोंदले असते. मात्र अचानकपणे दादा आपल्यातून निघून गेले आणि हा अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी आता माझ्यावर आली.” सभागृहात उपस्थित सर्वांनी शोकप्रस्तावाला मान्य करत अजित पवार यांच्या कार्याचं स्मरण केलं आणि त्यांना आदरांजली वाहिली.

Published on: Feb 23, 2026 02:36 PM

Follow Us
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!