AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथराव उशिरापर्यंत काम करु नका! शिंदेंकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा

एकनाथराव उशिरापर्यंत काम करु नका! शिंदेंकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा

राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Feb 23, 2026 | 1:06 PM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या प्रशासकीय कौशल्याचे, आर्थिक शिस्तीचे आणि कामाप्रती असलेल्या निष्ठेचे कौतुक केले. ते म्हणाले की, दादांनी राज्याचा आर्थिक गाडा समर्थपणे सांभाळला आणि अधिकाऱ्यांना काटकसरीचा सल्ला दिला. शिंदे यांनी अजित पवारांनी आरोग्याची काळजी घेण्याबद्दल दिलेल्या वडीलकीच्या सल्ल्याचेही स्मरण केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना अजित पवार यांच्या कार्यशैलीचे आणि प्रशासकीय कौशल्याचे कौतुक केले आहे. शिंदे यांच्या मते, अजित पवार यांनी महाराष्ट्राचा आर्थिक गाडा योग्य प्रकारे सांभाळला. ते प्रत्येक बैठकीत अधिकाऱ्यांना काटकसरीने खर्च करण्याचा सल्ला देत असत. महाराष्ट्राची आर्थिक घडी बसवण्यासाठी त्यांचा प्रदीर्घ अनुभव मोलाचा ठरला आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.

अधिवेशनाच्या काळात अजित पवार सभागृहात पूर्णवेळ थांबायचे आणि चर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायचे. त्यांच्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष असायचे आणि कामाच्या गुणवत्तेत ते कधीच तडजोड करत नसत. प्रशासकीय कौशल्याचे चालते बोलते विद्यापीठ म्हणून त्यांची ओळख होती. सामान्य नागरिकांविषयी त्यांना कळकळ होती आणि नव्याने राजकारणात येणाऱ्यांसाठी ते एक आदर्श होते, असेही शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांना अजित पवारांनी उशिरापर्यंत काम न करण्याचा आणि तब्येतीची काळजी घेण्याचा वडीलकीचा सल्ला अनेकदा दिला होता.

Published on: Feb 23, 2026 01:06 PM

Follow Us
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!