AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diabetes Myths: जांभूळ, मेथी खाल्ल्यास खरंच मधुमेहापासून सुटका? वाचा नेमकं सत्य काय?

Diabetes Myths: मधुमेहावर उपचार एखाद्या मसाल्याने किंवा घरगुती उपायाने होत नाही. त्यासाठी एक सुव्यवस्थित आणि वैयक्तिक योजना आवश्यक असतात. जर तुम्ही सारख टाळण्यासाठी मध किंवा गूळ खात असाल तर थांबा. ही बातमी नक्की वाचा...

Diabetes Myths: जांभूळ, मेथी खाल्ल्यास खरंच मधुमेहापासून सुटका? वाचा नेमकं सत्य काय?
मधुमेहImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 23, 2026 | 4:00 PM
Share

आजच्या काळात सुपरफूड आणि चमत्कारी डाएट्स सोशल मीडियावर झपाट्याने ट्रेंड करतात. अशा वेळी सत्य आणि भ्रम यांच्यातील फरक ओळखणे अत्यंत आवश्यक झाले आहे. विशेषतः जेव्हा भारतात १० कोटींपेक्षा जास्त लोक मधुमेह (डायबिटीज) सोबत जगत आहेत. याबाबात आता सत्य समोर आले आहे. मधुमेहाचा इलाज एखाद्या मसाल्याने किंवा घरगुती उपायाने होत नाही. त्यासाठी एक सुव्यवस्थित आणि वैयक्तिक योजना आवश्यक असते.

भारतीय घरांमध्ये अनेकदा असा समज असतो की मेथीचे दाणे, जांभूळ किंवा दालचीनी मधुमेह “बरा” करू शकतात. याविषयी एका डॉक्टरांनी सांगितले की, आजपर्यंत एखाद्या पदार्थाला मधुमेहाचा इलाज म्हणून सिद्ध केलेले नाही. काही गोष्टी संतुलित आहाराचा भाग बनू शकतात, पण रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी औषधे, नियमित व्यायाम आणि सतत मॉनिटरिंग गरजेचे आहे.

मधुमेहाबाबतचे काही सामान्य मिथक काय आहेत?

एक सामान्य गैरसमज असा आहे की जास्त साखर खाल्ल्याने थेट मधुमेह होतो. प्रत्यक्षात, रिफाइंड साखर आणि उच्च-कॅलरी पदार्थांचे वारंवार सेवन वजन वाढवते, विशेषतः पोटाभोवतीची चरबी, ज्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढते. पॅकेज्ड ज्यूस, कोल्ड ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्ससारख्या गोड पदार्थ टाइप २ मधुमेहाच्या जोखमीशी संबंधित आहेत. तर टाइप १ मधुमेह ही एक ऑटोइम्यून स्थिती आहे. फळांबाबतही भ्रम आहे की मधुमेह झाल्यानंतर त्यांना पूर्णपणे सोडून द्यावे लागते. तज्ज्ञांच्या मते, फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. पण त्याबरोबर फायबर, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सही असतात. योग्य प्रमाणात आणि ज्यूसऐवजी फळे घेणे उत्तम पर्याय आहे.

शुगर-फ्री योग्य आहे का?

-गूळ आणि मधाला साखरेपेक्षा जास्त सुरक्षित मानणेही चुकीचे आहे. हे तिन्ही साधे कार्बोहायड्रेट्स आहेत आणि रक्तातील साखर वेगाने वाढवू शकतात.

-त्याचप्रमाणे, तांदूळ पूर्णपणे सोडणे आवश्यक नाही. प्रमाण नियंत्रित ठेवा आणि त्याला डाळ, भाज्या आणि प्रोटीनसोबत संतुलित करा.

-“शुगर-फ्री” मिठाई खुलेआम खाणेही सुरक्षित नाही. त्यात फॅट आणि कॅलरी जास्त असू शकतात.

-हेही खरे आहे की मधुमेह फक्त जाड लोकांनाच होत नाही. दुबळे दिसणाऱ्या व्यक्तींमध्येही अंतर्गत चरबी इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवू शकते.

-मधुमेहाचा कोणताही चमत्कारी इलाज नाही. मेडिकल न्यूट्रिशन थेरेपी, संतुलित भोजन, फायबर आणि प्रोटीनचे योग्य प्रमाण, तसेच नियमित जीवनशैलीच दीर्घकाळात चांगले परिणाम देते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत)

सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा
पहाटेचा शपथविधी, अजितदादा का नाराज व्हायचे? फडणवीसांनी सांगितला किस्सा.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकनाथ शिंदेंकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा
अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकनाथ शिंदेंकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा.
शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा, 48 तासांनी डिस्जार्च मिळणार
शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा, 48 तासांनी डिस्जार्च मिळणार.
दादांच्या रुपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला; फडणवीसांची खंत
दादांच्या रुपात न लाभलेला मुख्यमंत्री गमावला; फडणवीसांची खंत.