AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेतील 18व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होईल. चेन्नई सुपर किंग्स विजय मिळवणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. पण यापूर्वी या दोन्ही संघांच्या लढती जाणून घेऊयात..

DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्या
DC vs CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनासामना, कोणाचं पारडं जड? जाणून घ्याImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 10, 2026 | 9:31 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 18व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना 11 एप्रिल रोजी चेन्नई येथील एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल. हा सामना चेन्नई सुपर किंग्सच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. कारण आतापर्यंत झालेल्या तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे प्लेऑफचं गणित सोडावयचं असेल तर उर्वरित 11 पैकी 7 सामने जिंकणं भाग आहे. त्यासाठी हा सामना खूपच महत्त्वाचा आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने तीन सामने खेळले असून त्यापैकी दोन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. गुणतालिकेत 4 गुणांसह दिल्ली कॅपिटल्सचा संघ चौथ्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्सचा संघ तळाशी म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हेड टू हेड

आयपीएल स्पर्धेत दोन्ही संघ 31 वेळा एकमेकांसमोर ठाकले आहेत. मागचा इतिहास पाहता चेन्नई सुपर किंग्सचं पारडं जड आहे. पण यंदा स्पर्धतील कामगिरी पाहता दिल्ली कॅपिटल्स संघ वजनदार आहे. चेन्नई सुपर किंग्सने 31 पैकी 19 सामन्यात विजय मिळवला आहे, तर दिल्ली कॅपिटल्सने 12 सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघात 2025 मध्ये चेपॉकवर आमनासामना झाला होता. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने 25 धावांनी जिंकला होता.आयपीएल 2024 मध्येही दोन्ही संघ आमनेसामने आले हेतो. तेव्हा दिल्ली कॅपिटल्सने हा सामना 20 धावांनी जिंकला होता. चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली कॅपिटल्सला शेवटचं 2023 मध्ये पराभूत केलं होतं. चेपॉकमध्ये नाणेफेकीचा कौल हा महत्त्वाचा ठरणार आहे. कारण संध्याकाळी दव पडतं आणि धावसंख्येचा पाठलाग करणं सोपं होतं. नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल, यात शंका नाही.

दुसरीकडे, आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्सने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण दिल्ली कॅपिटल्स अजूनही पहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. पण यंदाची चेन्नई सुपर किंग्सची स्थिती पाहता प्लेऑफचा मार्ग प्रत्येक पराभवानंतर किचकट होत जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात विजयाचा दबाव हा पूर्णपणे चेन्नई सुपर किंग्सवर असणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...