Krishna Shroff : टायगरची बहीण कृष्णाचा पगार होता ड्रायव्हर एवढा; आकडा ऐकून थक्क व्हाल
अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफने अभिनय सोडून उद्योजकतेची वाट निवडली. तिने कुटुंबियांसह 'MMA मॅट्रिक्स' हे फिटनेस सेंटर सुरू केले, जे मुंबईतील फिटनेस क्षेत्रातील उणीव भरून काढते. फिल्म प्रोडक्शनची पदवी असूनही तिला अभिनयात रुची नव्हती. बास्केटबॉल कोच म्हणून पहिली नोकरी करणाऱ्या कृष्णाने आता यशस्वी उद्योजिका म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर श्रॉफ कुटुंब चर्चेत आलं आहे. अभिनेता जॅकी श्रॉफपासून ते कृष्णा श्रॉफ यांची चर्चा सुरू झाली आहे. श्रॉफ कुटुंबात फक्त जॅकी श्रॉफ आणि टायगर हे दोघेच अभिनय क्षेत्रात आहे. टायगरची आई आयशा या उद्योजिका आहेत. तर बहीण कृष्णा ही बॉलिवूडपासून दूरच आहे. कृष्णा सुद्धा बिझनेस वूमन आहे. दोघी मायलेकी बिजनेस चालवतात. कृष्णाला तिच्या पहिल्या कामाचा चेक मिळाला होता. तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आश्चर्य म्हणजे तिची पहिली सॅलरी तिच्या ड्रायव्हरच्या पगारा एवढी होती.
कृष्णाकडे फिल्म प्रोडक्शनची डिग्री आहे. शिक्षण घेत असतानाच कॅमेऱ्याच्या मागे आणि पुढे काम करणं हा आपला पिंड नाहीये, हे तिच्या लक्षात आलं होतं. प्रसिद्ध कुटुंबातील असल्यामुळे तिला अनेक संधी मिळाल्या. पण सिनेमाच्या जगाने तिला कधीच आपल्याकडे खेचलं नाही. इतर स्टार मुलं जे करतात तेच मी करावं असं अनेकांना वाटत होतं. पण माझं मन सिनेमात रमत नव्हतं. जे आपल्याला आवडतं तेच केलं पाहिजे, असं वाटायचं. म्हणूनच मी सिनेमाच्या दुनियेत आले नाही. असं कृष्णाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
नव्या क्षेत्रात उडी
स्पॉटलाइटच्या दुनियेत रमण्याऐवजी कृष्णाने सुरुवातीला स्ट्रेंथ ट्रेनिंग, फिटनेस आदी गोष्टींकडे लक्ष दिलं. त्यात करिअर करण्याचा प्रयत्न केला. नंतर तिने उद्योजिका बनण्याचा निर्णय घेतला. आरोग्य आणि वेलनेसकडे तिचा अधिक ओढा असल्यानेच ती मुंबईतील हाई अँड फिटनेस सेंटरच्या MMA Matrix ची सह संस्थापिका झाली. या ठिकाणी स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि मिक्स्ड मार्शल आर्ट दोन्ही शिकवलं जातं. हा कृष्णा, टायगर आणि आयशा यांचा कौटुंबिक उद्योग आहे. टायगर सिनेमात असल्याने त्याचं याकडे फार लक्ष नसतं. पण तो या सेंटरचा ब्रँड चेहरा आहे. मात्र, कृष्णा आणि आयशा या उद्योगात पूर्ण सक्रिय आहेत.
एका उणीवेमुळे जन्म
बाजारातील एका उणीवेमुळे MMA Matrix चा जन्म झाल्याचं कृष्णा सांगते. टायगर स्वत: मार्श आर्टिस्ट आहे. MMA आणि फंक्शनल दोन्ही ट्रेनिंग एकाच ठिकाणी मिळायल्या हव्यात, असं टायगरला वाटत होतं. कारण त्यावेळी मुंबईत या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी नव्हत्या. त्यामुळे केवळ चर्चा करण्यापेक्षा या तिघांनी हे सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून MMA Matrixचा जन्म झाला.
आयशा श्रॉफ यांनीही एका मुलाखतीत सेंटरची माहिती दिली होती. जेव्हा आम्ही या क्षेत्रात पाऊल टाकलं तेव्हा एका भारतीय फायटरचा पगार केवळ 17 हजार रुपये होता. आणि डेब्यू करणाऱ्या फायटरला सुमारे 1.74 लाख रुपये मिळत होते. टायटलसाठी लढणाऱ्याला 8.7 लाख रुपये मिळत होते. जगभरातील कोणत्याही पेशाच्या पगाराशी तुलना केली तर आमचा पगार अजूनही ठिक आहे, असं आयशा यांनी सांगितलं होतं.
पहिली नोकरी कोचची
कृष्णाचं करिअर एखाद्या बोर्डरुमपासून सुरू झालं नाही. बास्केटबॉल कोच म्हणून तिने पहिली नोकरी केली होती. त्यावेळी तिला अत्यंत कमी पगार मिळत होता. तिचा पहिला पगार मला आजही आठवतोय. जेव्हा तिने मला पहिला पगार दाखवला तेव्हा मला आश्चर्य वाटलं. तिला म्हटलं, किशू, खूपच छान. तुझ्या ड्रायव्हर एवढाच तुझा पगार आहे, अशी आठवणही आयशा यांनी सांगितली. त्यावेळी ड्रायव्हरला 15 ते 20 हजाराच्या आसपास पेमेंट मिळायचा.
