AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एआर रहमान यांना मोठा झटका, थेट ‘रामायणा’तून हटवण्याची मागणी; नेटकरी म्हणाले, अजय-अतुल…

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' सिनेमातील 'रावण तांडव' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. सुपरस्टार यशच्या रावणाच्या दमदार अभिनयाची प्रचंड प्रशंसा होत असली तरी, गाण्यातील एआर रहमानच्या संगीतावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेकांना रहमानचं संगीत साधं वाटलं असून, सोशल मीडियावर 'रहमान हटाओ'ची मागणी जोर धरू लागली आहे.

एआर रहमान यांना मोठा झटका, थेट 'रामायणा'तून हटवण्याची मागणी; नेटकरी म्हणाले, अजय-अतुल...
ar rahmanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 21, 2026 | 4:29 PM
Share

‘रामायण’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. दसऱ्याचा मुहूर्त साधून सिने निर्मात्यांनी या सिनेमातील ‘रावण तांडव’ हे गाणं रिलीज केलं आहे. या गाण्यात दाक्षिणात्य सुपरस्टार यश हा रावणाच्या दमदार आवतारात दिसत आहे. यशचा इंटेन्स अभिनय आणि तांडव अंदाज प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे. त्याच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. पण गाण्याचं संगीत हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. तांडव म्हटल्यावर हे गाणं जोश आणि एनर्जीने ठासून भरलेलं असेल असं प्रेक्षकांना वाटत होतं. पण काही प्रेक्षकांना एआर रहमानचं संगीत अगदीच साधं आणि मिळमिळीत वाटलं. त्यामुळेच रहमान हटावची मागणी आता सोशल मीडियातून होत आहे.

नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनात रामायण हा सिनेमा तयार होत आहे. या सिनेमातील काल प्रदर्शित झालेलं गाणं 1 मिनिट 55 सेकंदाचं आहे. या व्हिडीओत रावणाची भगवान शिवाच्या प्रती भक्ती दाखवण्यात आली आहे. हे गाणं शिव तांडव स्तोत्रावर तयार करण्यात आलं आहे. गाण्याच्या सुरुवातीलाच रावण खंजिरीने आपला हात कापतो. मस्तकावर त्रिपुंड टिळा लावतो. त्यानंतर भगवान शिवाच्या विशाल प्रतिमेसमोर आरती करतो. त्यानंतर तो तांडव करताना दिसत आहे.

संगीत अगदीच…

या व्हिडीओमध्ये अभिनेता यशचं रौद्र रुप, त्याचा दमदार अंदाज आणि तांडवची कोरिओग्राफी पाहायला मिळतेय. त्याचा लूक आणि अभिनय लोकांना प्रचंड आवडला आहे. पण गाण्याचं संगीत मात्र काही लोकांना आवडलं नाही. हे संगीत अगदीच साधं आणि मिळमिळीत असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.

सोशल मीडियातील कमेंट्स काय?

‘रावण तांडव’च्या हिंदी वर्जनचे शब्द डॉ. कुमार विश्वास यांचे आहेत. कुमार विश्वास यांनी हे गाणं लिहिलं आहे. त्याला एआर रहमानने संगीत दिलं आहे. तर विशाल ददलानीने हे गाणं गायलं आहे. गाणं रिलीज होताच प्रेक्षकांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. या सिनेमात रहमान फिट बसत नाही. त्याची निवड चुकीची आहे, असं काही प्रेक्षकांनी म्हटलं आहे. काहींनी तर सिक्वलच्यावेळी रहमानच्या जागी इतर दुसऱ्या संगीतकाराला संधी द्यायला हवी होती, असं म्हटलं आहे.

अजय-अतुलला घ्या

एका यूजरच्या मते, एआर रहमानची या सिनेमासाठीची निवड योग्य नाही. दुसऱ्या यूजर्सने, रहमानचं संगीत निराशाजनक असल्याचं सांगतानाच रहमान यांची निवड चुकीची आहे, असं म्हटलंय. एकाने तर अजूनही वेळ गेलेली नाही. संगीतकार बदलला पाहिजे, असं म्हटलंय. काहींनी तर या गाण्यासाठी अजय-अतुलचं नावही सूचवलं आहे.

Follow Us
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?