AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: टीम इंडियासाठी 2 तासांचा उशीर डोकेदुखी ठरणार! न्यूझीलंडमध्ये मैदानावर रात्री 8 वाजता असं काय घडणार? जाणून घ्या सर्वात मोठं आव्हान

India vs New Zealand T20 Series: टीम इंडियाची न्यूझीलंडविरुद्धची मालिका २२ ऑक्टोबरच्या सकाळी सुरू होणार आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर खेळवला जाणार आहे.

IND vs NZ: टीम इंडियासाठी 2 तासांचा उशीर डोकेदुखी ठरणार! न्यूझीलंडमध्ये मैदानावर रात्री 8 वाजता असं काय घडणार? जाणून घ्या सर्वात मोठं आव्हान
| Updated on: Oct 21, 2026 | 10:06 PM
Share

Why Do New Zealand T20 Matches Start at 8 PM?: २२ ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच न्यूझीलंडमधील मैदान हे चर्चेचा विषय बनले आहे. कारण आहे तेथील हवामान. न्यूझीलंडमध्ये जेव्हा दिवस-रात्र टी२० सामना खेळला जातो, तेव्हा त्याची सुरुवात संध्याकाळी ६ वाजता होते. म्हणजेच सामना संध्याकाळी ६ वाजता सुरू होतो. रात्री ९ वाजेपर्यंत संपतो. मात्र भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिका रात्री ८ वाजता सुरू होणार आहे.

ही मालिका न्यूझीलंडमध्ये वेळेपेक्षा दोन तास उशिरा सुरू होणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारत आणि न्यूझीलंडमधील वेळेतील फरक. जर सामना न्यूझीलंडमध्ये रात्री ८ वाजता सुरू झाला तर भारतात दुपारचे १२:३० वाजलेले असतील. यामुळेच न्यूझीलंडमध्ये सामना दोन तास उशिरा सुरू होणार आहे. मात्र या दोन तासांच्या विलंबाचे भारतीय संघावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. भारतीय संघासाठी हे एक मोठे आव्हान ठरू शकते.

रात्री ८ वाजता सुरू होणारा हा सामना भारतीय संघासाठी एक मोठे आव्हान ठरू शकतो. याचे कारण समोर आले आहे. आजकाल क्राइस्टचर्चमध्ये दुपारच्या वेळी साधारणपणे ऊन असते. मात्र रात्री ८ वाजता जोरदार वारे वाहू लागतात. हवामान अचानक थंड होते, म्हणजेच तापमानात लक्षणीय घट होते. हॅगली ओव्हल स्टेडियमच्या मागे डोंगर आहेत. थंड वाऱ्यांमुळे मैदानावर खूप दव पडते. भारतीय संघाने दुपारी सराव केला आहे, पण सामना रात्री होणार असल्याने भारतीय खेळाडूंना हवामानाशी जुळवून घेणे कठीण जात आहे.

न्यूझीलंडच्या या मैदानावर चेंडू खूप स्विंग होऊ शकतो. ज्यामुळे भारताच्या अव्वल फळीसाठी समस्या निर्माण होऊ शकते. एकदा स्थिरावल्यावर धावा करता येत असल्या तरी भारतीय परिस्थितीच्या विपरीत स्थिरावल्यावर लगेच षटकार मारणे खूप कठीण आहे. हॅगली ओव्हल मैदान १८८६ मध्ये उघडण्यात आले आणि ते क्राइस्टचर्च येथे आहे. हॅगली ओव्हलवर आतापर्यंत १९ टी२० सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ९ आणि पाठलाग करणाऱ्या संघाने १० सामने जिंकले आहेत.

हॅगवे ओव्हलवर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या फक्त १५९ आहे. याच मैदानावर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या फक्त १२९ आहे. हॅगली ओव्हलवर इंग्लंडने २३६ धावा केल्या आहेत. ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे, तर बांगलादेश महिला संघाने ३२ धावा केल्या आहेत. हॅगली ओव्हलवर सर्वाधिक १७७ धावांचा पाठलाग पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध केला आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?