AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशाला पंतप्रधान नसेल, राज ठाकरेंच्या खळबळजनक भाकितावर भाजपची पहिली प्रतिक्रिया, बडा नेता म्हणाला, मुंगेरीलाल के….

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देशात पुढील चार ते पाच महिन्यांमध्ये मोठी काहीतरी गडबड होईल असा खळबळजनक दावा केल्याननंतर आता भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपने राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

देशाला पंतप्रधान नसेल, राज ठाकरेंच्या खळबळजनक भाकितावर भाजपची पहिली प्रतिक्रिया, बडा नेता म्हणाला, मुंगेरीलाल के....
Raj Thackeray on DemocracyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 21, 2026 | 10:26 PM
Share

राज ठाकरेंनी केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर आता भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटलं की, राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असं म्हणावं लागेल, असं म्हटलं आहे. ठाकरे बंधूंनी राम मंदीराच्या उद्घाटनावेळीही देशात दंगे होतील, असं भाकित केलं होतं, परंतू तसं न होता राम मंदिराचं थाटात आणि निर्विघ्नपणे लोकार्पण झालं. सारे उत्सव पार छान पद्धतीने पार पडले, त्यामुळे राज यांचं हे वक्तव्य म्हणजे मुंगेरीलालके हसीन सपने असंच म्हणाव लागेल, असं म्हणत असा घणाघात त्यांनी राज ठाकरेंवर केला आहे.

राज ठाकरेंचा दावा काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आज मुंबईत एका छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाला पोहोचले होते. तिथे त्यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, भारतातल्या निवडणुका आता पारदर्शक पद्धतीने पार पडल्या पाहिजेत. जगातील अनेक देशांमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका पार पडतात. ज्यामध्ये पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, नेपाळचा समावेश आहे. एकीकडे अख्ख जग इव्हीएम मशीन नाकारत आहे पण भारतात मात्र त्याचा अट्टाहास का केला जातोय. देशात कित्येकदा अनेकांनी याविरोधात आवाज उठवला आहे. फ्रान्समध्ये तर केवळ एका व्यक्तीच्या सांगण्यावरुन बॅलेटपेपरवर निवडणूक घेतली गेली. पुढील ४ ते ५ महिन्यांत देशात काहीतरी मोठी गडबड होणार आहे, हे निश्चित आहे. देश रस्त्यावर आला तरीही मला काही आश्चर्य वाटणार नाही, असा खळबळजनक दावा राज ठाकरेंनी यावेळी केला आहे.

पुढे बोलताना राज ठाकरेंनी सांगितलं की, एक काळ येईल देशाला पंतप्रधान नसेल. मुलांनी काहीच केलं नव्हतं. तुम्ही हंगामा केला. शांततेत ते आंदोलन करत होते. पण दिल्ली पोलिसांनी मारहाण केली. आता देशात लोकशाही राहिली कुठे आहे. अनेक सरकारला न झेपणाऱ्या गोष्टी उडग होतील, खरी लोकशाही तर अमेरिकेत आहे. आपल्याकडे नाही. तिथे कोणत्याही प्रकारचे फतवे निघत नाहीत.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?